गोड आवाज आणि चेहरा लाभलेली बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हीचा आज 35 वा वाढदिवस आहे. श्रेया घोषाल हिचा गोड आवाज अनेकांना मंत्रमुग्ध करतो. बॉलिवूडमधील सर्वोत्त्कृष्ट गायिकांपैकी श्रेया घोषाल ही एक. श्रेयाच्या रोमांटिक गाण्यांचे अनेकजण चाहते आहेत. त्याचबरोबर श्रेयाचे सॅड सॉन्ग्स देखील खूप लोकप्रिय आहेत. हीचा जन्म 12 मार्च 1984 साली झाला. श्रेयाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या लोकप्रिय ठरलेल्या रोमांटिक गाण्यांविषयी...
- सायबो (Saibo)
'शोर इन द सिटी' या रोमांटिक गाणे प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले. या सिनेमात राधिका आपटे आणि तुषार कपूर हे प्रमुख भूमिकेत होते.
2. सांस (Saans)
शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली. श्रेयाचा समधूर आवाज आणि शाहरुख-कतरिनाची केमिस्ट्री यात लोकप्रिय ठरली.
3. तेरी ओर (Teri Ore)
'सिंग इज किंग' सिनेमातील 'तेरी ओर हे' गाणे आजही प्रेक्षकांना मंत्रमूग्ध करते.
4. तुझ में रब दिखता है (Tujh Me Rab Dikhta Hain)
शाहरुख खान-अनुष्का शर्मा यांच्यावर चित्रीत 'रब ने बना दी' जोडी सिनेमातील हे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले.
5. ये इश्क हाय (Ye ishq Hai)
'जब वी मेट' सिनेमातील शाहिद-करीनाची केमिस्ट्री दाखवणारे हे गाणे अजूनही अनेकांना ताजेतवाने करते.
फक्त हिंदीतच नाही तर श्रेयाने विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मराठी गाणी गाऊन तिने मराठी प्रेक्षकांच्या मनातही स्थान निर्माण केले आहे. 'सैराट' सिनेमातील 'आत्ताच बया का बावरले', 'बकेट लिस्ट' सिनेमातील 'तू परी' तर 'चि. व चि.सौ.का.' या सिनेमातील 'मन हे' अशा अनेक मराठी गाण्यांना श्रेयाने आपल्या आवाजाने खुलवले आहे. तर 'खुलता कळी खुलेना' या मराठी मालिकेसाठी शिर्षक गीत आपल्याला श्रेयाच्या आवाजात ऐकायला मिळते.