'गुलाबो सीताबो' सिनेमात पाहायला मिळणार  'आयुषमान खुराना' आणि 'अमिताभ बच्चन' यांची सिल्व्हर स्क्रीनवर जुगलबंदी
Amitabh Bachchan, Ayushmann Khurrana, Shoojit Sircar (Photo Credits: Instagram)

Upcoming Film Gulabo Sitabo: आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे, दोन वेगळ्या पिढ्यांमधील अभिनेते म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) आणि आयुषमान खुराना (Ayushman Khurana) शूजीत सरकार (Shoojeet Sarkar)  यांचा आगामी चित्रपट गुलाबो सीताबो (Gulabo sitabo) यामध्ये पहिल्यांदाच एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. ही बातमी समजताच आयुषमानच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये, साहजिकच मागच्या काही महिन्यांपासून बधाई हो (Badhai Ho),अंधाधुन (Andhadhun) सारखे लागोपाठ हिट सिनेमा केलेला आयुषमान आपल्या पहिला सिनेमा विकी डोनरचा (Vicky Donor)  दिग्दर्शक सुजीत सरकार सोबत पुन्हा काम करणार आहे आणि त्यात महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं म्हणजे सोन्याहून पिवळंच!

साधारण नोव्हेंबर 2019 मध्ये येऊ घातलेल्या या सिनेमाचे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमाविषयी नुकतीच आयुषमान ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून माहिती दिली.

शिवाय दिग्दर्शक सुजीत सरकार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून या सिनेमाच्या कथानकावर लेखिका जुही त्रिवेदी आणि सुजीत काम करत होते. "जेव्हा मी ही कथा ऐकली त्या क्षणी यासाठी अमिताभ बच्चन आणि आयुषमान याला सिनेमात घेण्याचा विचार डोक्यात आला, खरतर या कथेवर अजून काही दिवस काम करून मग पुढे जाणार होतो पण सगळ्या टीमचा उत्साह पाहता आता दोन्ही कलाकारांच्या शूटिंगच्या तारखांपासून सगळं ठरवून याच वर्षी सिनेमा प्रदर्शित करणार आहोत" असे सुजीत यांनी सांगितले. बॉलिवूडचा महानायक तब्बल २५ वर्षानंतर झळकणार मराठी चित्रपटात, एबी आणि सीडी असे आहे ह्या चित्रपटाचे नाव

गुलाबो सीताबो ही उत्तर प्रदेशाच्या बोलीभाषेत वापरली जाणारी नावे आहेत. सीताबो ही कामसू पत्नी आणि गुलाबो ही सुंदर प्रेयसी यांच्यामध्येब अडकलेल्या एका तरुणाची कथा असून याला कॉमेडी आणि स्थानिक टच देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे देखील सुजीत यांनी सांगितले. दरम्यान चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड अद्याप करण्यात आलेली नाही. तूर्तास आयुषमान बाला सिनेमा व बिग बींच्या चेहरा सिनेमाचे शूटिंग सुरु आहे तर सुजीत देखील सध्या विकी कौशल सोबत उधम सिंग यांच्या बायोपिकचे काम करत आहे काहीच दिवसात गुलाबो सीताबोच्या चित्रीकरणाला सुरवात करण्यात येईल