Salman Khan And Shilpa Shetty Relationship: बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी अफेअर, डेटिंग आदी गोष्टींची चर्चा, अफवा नवी गोष्ट नाही. बॉलिवुडमध्ये रोज अशा नवनव्याअफेअर्सच्या बातम्या येतात. त्यावर चर्चा होते आणि कालांतराने तो विषय आणि चर्चाही कमी होत जाता. भविष्यात कधीतरी कोणी तो विषय खोदून काढलाच तर पुन्हा एकदा त्या विषयावर नव्याने चर्चा होते इतकेच. अर्थात, यातील बऱ्याच बातम्या केवळ अफवा ठरत असल्या तरी, त्याला अनेकदा सत्याचाही गंध असतोच. साधारण 90 च्या दशकात बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. खरे खोटे त्या दोघांनाच माहिती. पण, ना सलमान ना शिल्पा दोघांनीही या चर्चेला जाहीर दुजोरा कधीच दिला नाही. मात्र, इतक्या वर्षांनंतर शिल्पाने अफेअरच्या (Salman Khan-Shilpa Shetty Affair) या चर्चेबाबत मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थात शिल्पाने दिलेल्या प्रतिक्रियेतही ती सलमानसोबतच्या अफेअरबद्दल काहीच बोलत नाही. परंतू, सलमान अनेकदा माझ्या घरी येत असे. रात्र रात्रभर तो माझ्या घरी थांबत असे. माझ्या वडीलांसोबत ड्रिंक्स घेत असे, अशा आठवणी मात्र शिल्पा जरुर सांगते. शिल्पा शेट्टी हिच्या एका मुलाखतीचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दोघेही कधी ठरवून डेटवर गेले नाहीत. मात्र, त्या काळाद दोघांमध्ये खूप चांगले संबंध राहिले आहेत. सलमानबोबतची एक आठवणही शिल्पाने सांगितली. ती म्हणाली, तिच्या (शिल्पा शेट्टी) वडिलांचे निधन झाले तेव्हा सलमान दिला भेटायला तिच्या घरी गेला होता. घरी आल्यावर तो थेट बार टेबल जवळ गेला. येथे बसून तिचे वडील आणि सलमान ड्रिंक्स घेत असत. तिच्या वडिलांच्या जुन्या आठवणी काढून सलमानला रडू आल्याचेही शिल्पाने सांगितले (हेही वाचा, शिल्पा शेट्टी डाएट म्हणजे मेंटेन फिगर, कमनीय बांधा, नाजूक कटी; घ्या जाणून)
दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांनी काही चित्रपटांत एकत्र काम केले आहे. यात 'शादी करके फंस गया', 'फिर मिलेंगे', 'गर्व', 'दस' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्या काळात दोघांची जोडीही प्रेक्षकांना जोरदार आवडली. 2009मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्रा यांच्यासोबत विवाह केला.
शिल्पा शेट्टी हिच्यानंतर कतरीना कैफ, जॅकलीन फर्नांडीस आणि युलिया वंतूर या अभिनेत्रींसोबतही सलमान खानचे नाव जोडण्यात येते. त्यांच्यात अफेअर असल्याची चर्चा होते. सध्यास्थितीत सलमान त्याचा आगामी चित्रपट 'भारत'च्या कामात व्यग्र आहे. तर, शिल्पा शेट्टी टीव्ही रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर 3'ची जज म्हणून काम पाहते आहे.