Salman Khan-Aishwarya Rai Relationship | (Photo credit: archived, edited, representative image)

Sohail Khan Slammed Aishwarya Rai: अभिनेता सलमान खान(Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (-बच्चन) (Aishwarya Rai Bachchan) यांच्यातील नाते आता केवळ बॉलिवूड इतिहासातील एक घटना. यापलीकडे या नात्याला आता तसा काहीच अर्थ उरला नाही. कारणे, हे नाते केव्हाच संपुष्टात आले आहे. काहीतरी निमित्त ठरतं आणि गॉसिप करणाऱ्या मंडळींना चर्चेला विषय होतो. प्रसारमाध्यमांतून मग या नात्याच्या अनेक कहाण्या रंगवून ऐकवल्याही जातात. आता पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबद्दल प्रसारमाध्यमांतून बातम्या आल्या आहेत. या वेळी निमित्त ठरला आहे, सलमान खान याचा भाऊ सोहेल खान. ऐश्वर्या आणि सलमान यांच्या नात्याबाबत सोहेल खान (Sohail Khan) याने नुकतीच काही वक्तव्ये केली आहेत. जी ऐकून तुम्हालाही कदाचित धक्का बसेल. मग तुम्ही ऐश्वर्याचे चाहते असा किंवा सलमानचे.

एका मुलाखतीदरम्यान सोहेल खान याने आपला भाऊ सलमान याला पाठींबा देत थेट ऐश्वर्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे. सोहेलने म्हटले आहे की, आता ती सार्वजानिक ठिकाणी असे बोलते आहे, जेव्हा ती सलमानसोबत फिरत होती, जेव्हा ती आमच्या घरी येत होती तेव्हा, ती रिलेशनशिप स्वीकारली होती काय? पुढे बोलताना सोहेलने म्हटले आहे की, तो असा कधीच वागला नाही. उलट ऐशनेच सलमानला असुरक्षित केले. सलमान जाऊन घेऊ इच्छित होता की, ती त्याला किती पसंद करते. पण, ती सलमानवरच आगपाखड करत होती.

ऐश्वर्याने केलेल्या मारहाणीच्या आरोपाबद्दल बोलताना मिड डेला दिलेल्या मुलाखतीवेळी सलमान म्हणाला होता की, मी ऐश्वर्याला कधीच मारहाण केली नाही. जेव्हा मी खूप भावनिक (इमोशनल) होतो तेव्हा, मी स्वत:लाच वेदना करुन घेतो. मी माझे डोके भिंतीवर आपटले होते. मी कोणा इतरांना इजा पोहोचवू शकत नाही. मी फक्त सुभाष घई यांच्यावर हात उचलला होता. मात्र, नंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांची माफीही मागितली होती.

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याने मुंबई येथे बोलताना म्हटले होते की, मीडिया सजग आहे. महिलांच्या आवाजाला तो योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देतो आहे, हे पाहून मला फार आनंद वाटला. आता कायद्याने त्याचे काम करायला हवे. ऐश्वर्याने पुढे असेही म्हटले आहे की, अशा मुद्द्यांवर ती पहिल्यापासून बोलत आली आहे. आगोदरही बोलली आहे. आजही बोलत आहे. यापुढेही बोलत राहीन. दरम्यान, लैंगिक शोषण हा बॉलिवूडसाठी काही नवा शब्द नसल्याचेही ऐश्वर्याने म्हटले आहे. मात्र, आता तो अधिक व्यापक आणि गंभिर्याने घेतला जात आहे. जागृत कायदा आणि सोशल मीडियाच्या सतर्कतेमुळेच हे शक्य झाल्याचेही ऐश्वर्याने म्हटले आहे. (हेही वाचा, जोधपूर: सलमान खान ह्याचे काळवीट शिकार प्रकरण नव्या वळणावर, उच्च न्यायालयाने सांगितली 'ही' गोष्ट)

दरम्यान, सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात 19 वर्षांपूर्वी काही नाते निर्माण झाले होते. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये भावनिक गुंतागुंत झाली आणि दोघे रिलेशनमध्ये आले. दरम्यान, अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत दोघे वेगळेही झाले. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याने सलमानच्या अतिमद्यपान (दारु पिणे) करण्याच्या सवयीवर आणि त्या नशेत गैरवर्तन करण्यावर टीका केली होती. तसेच, सलमान खान तिला शिविगाळ करत मारहाण करत असल्याचाही आरोप तिने केला होता. स्वत:च्या आत्मसन्मानाचा विचार करुन तिने सलमानपासून दूर होण्याचा नर्णय घेतल्याचे तिने म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावर तेव्हाही सोहेलने पलटवार केला होता. सलमानने शारीरिक आणि मानसिकरित्या त्रास दिल्याचा आरोप करत ऐश्वर्याने एक पत्रकही प्रसारमाध्यमांना दिले होते. सलमानने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, ऐश्वर्याने 2007मध्ये अभिषेक बच्च याच्याबरोबर लग्न केले. त्यानंतर हे प्रकरण संपल्याचे मानले जात होते.