जोधपूर: सलमान खान ह्याचे काळवीट शिकार प्रकरण नव्या वळणावर, उच्च न्यायालयाने सांगितली 'ही' गोष्ट
सलमान खान (Photo Credits: Instagram)

अभिनेता सलमान खान (Salman Khan) ह्याच्या काळवीट शिकार प्रकरणाला नवे वळण लागले आहे. या खटल्याबाबत सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचसोबत सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे, तब्बू व नीलम यांना पुराव्यांअभावी या चौघांना निर्दोष ठरविण्यात आले. कोर्टाच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या सरकारने उच्च न्यायलयात याविरुद्ध एक याचिका दाखल केली आहे. परंतु सरकारकडून ही याचिका एवढ्या उशिरा कशी दाखल झाली याबाबत उत्तर मागत न्यायलयाने प्रार्थना पत्र सादर करण्यास सांगितले आहे.त्यासोबत अन्य त्रुटी हटवत पुढील सुनावणी येत्या 28 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे सरकारकडे आता न्यायालयाला उत्तर देण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी मिळणार आहे. मीडियाकडून आलेल्या रिपोर्ट्सनुसार, या कलाकारांविरुद्ध याचिका 53 दिवस उशिरा दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायमूर्ती पंकज भंडारी यांनी याबबात सरकारला प्रार्थना पत्र जमा करण्यास सांगितले आहे.

सुनावणी दरम्यान, सरकारच्या वतीने उपराजकीय अधिवक्ता विक्रमसिंह पुरोहित उपस्थित होते. तर 5 एप्रिल, 2018 रोजी जोधपूर न्यायालयाने सलमान खान ह्याला 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती. तर सैफ, सोनाली आणि नीलिमा यांना निर्दोष ठरविले. मात्र सरकारने हे चुकीचे असल्याचे सांगत न्यायालयात आता याचिका दाखल केली आहे.