Shayad Song in Love Aaj Kal: सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अव्यक्त प्रेमाला सुरेल शब्दांनी साद देणारे 'लव्ह आज कल' चित्रपटातील रोमँटिक गाणे 'शायद' एकदा ऐकाच
Love Aaj Kal 2 (Photo Credits: YouTube)

गुलाबी प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणा-या 'व्हॅलेनटाईन डे' ला इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल 2' (Love Aaj Kal) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्ट ने अनेक राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. त्यामुळे या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. नुकतच या चित्रपटातील एक छान रोमँटिक गाणे 'शायद' प्रदर्शित झाले आहे. सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री या गाण्यात तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफस्क्रीन बरेच चर्चेत असलेली ही जोडी ऑनस्क्रीन कशी दिसेल हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

हे गाणे सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह (Arijit Singh) याच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले असून प्रितम हे या गाण्याचे संगीतकार आहे. पाहा या गाण्याचा व्हिडिओ

हेदेखील वाचा- Love Aaj Kal First Look: सारा अली खान आणि कार्तिक आर्यन च्या प्रेमाची कथा सांगणारा 'लव्ह आज कल' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

कार्तिक आणि साराच्या जोडीमुळे प्रेक्षकही या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. गेले वर्षभर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांनीही अप्रत्यक्षपणे अनेकदा आपले रिलेशनशिप स्टेटस मान्य देखील केले होते. त्यामुळे या चित्रपटाबाबतची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली. प्रेक्षकांची कार्तिक आणि सारा या दोघांना एकत्र काम करताना पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.