Love Aaj Kal First Look: सारा अली खान आणि कार्तिक आर्यन च्या प्रेमाची कथा सांगणारा 'लव्ह आज कल' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
Love Aaj Kal (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील सध्याचे हॉट आणि सर्वात चर्चेत असलेली गोड जोडी म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan). हे जोडी लवकरच 'लव्ह आज कल' या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. नुकत्याच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. हे पोस्टर या चित्रपटातील झू म्हणजेच सारा अली खानने शेअर केला आहे. या पोस्टरमधून सारा आणि कार्तिकचा रोमँटिक अंदाज आणि ऑफस्क्रीन केमिस्टीही पाहायला मिळेल. लव्ह आज कलच्या पहिल्या पोस्टरला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरुन या चित्रपटात 1990 मधील प्रेम आणि 2020 सालामधील सध्याचे प्रेम दाखविण्यात आले आहे असं दिसतय. 2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या त्या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. आता ‘लव्ह आज कल’च्या रिमेकमध्ये सैफची लेक सारा अली खान झळकणार आहे.

पाहा पोस्टर:

हेदेखील वाचा- सारा अली खान चा हा 'अगडबम' फोटो पाहून अभिनेता कार्तिक आर्यन ने केले असे मजेशीर कमेंट, वाचा सविस्तर

कार्तिक आणि साराच्या जोडीमुळे प्रेक्षकही या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. गेले वर्षभर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांनीही अप्रत्यक्षपणे अनेकदा आपले रिलेशनशिप स्टेटस मान्य देखील केले होते. त्यामुळे या चित्रपटाबाबतची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली. प्रेक्षकांची कार्तिक आणि सारा या दोघांना एकत्र काम करताना पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

इम्तियाज अली दिग्दर्शित लव्ह आज कल या चित्रपटाची संगीत दिग्दर्शनाची धुरा प्रितम यांनी सांभाळली आहे. येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेनटाईन्स डे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे हे दोघे आपल्यातील रोमांस ऑनस्क्रीन कसा दाखवतली आणि तो प्रेक्षकांना कितपत आवडेल हे लवकरच कळेल.