मधुर भांडारकर यांच्या 'Inspector Galib' चित्रपटातून शाहरुख खान झळकणार?
Shahrukh Khan (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मध्ये किंग खान अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shahrukh Khan) लवकरच आपल्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर जीरो (Zero) चित्रटातून सुद्धा शाहरुख ह्याने मुख्य भुमिका साकारली होती. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली नसल्याचे दिसून आले. परंतु आता शाहरुख चित्रपटात काम करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेत आहे. सध्या शाहरुख आगामी चित्रपटाच्या काही स्क्रिप्टचे वाचन करत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख ह्याने मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचा आगामी सिनेमा 'इन्सपेक्टर  गालिब' (Inspector Galib) ह्याची स्क्रिप्ट वाचत असून त्यामध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी गालिबसाठी सुशांत सिंह राजपूत ह्याचे नाव भुमिकेसाठी सुचवण्यात आले होते. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशातील रेती माफियावर असून त्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या अशा माफियांना पकडणाऱ्या एका पोलिसाची कथा आहे.(हेही वाचा-SOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा)

परंतु अद्याप मधुर भांडारकर यांच्याकडून अधिकृतपणे गालिब चित्रपटात शाहरुख भुमिका साकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तर एका कार्यक्रमात भांडारकर यांना या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. तसेच दुसऱ्या बाजूला शाहरुखने जूनमध्ये एका नव्या चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे.