
बॉलिवूडचा डॉन, किंग खान, रोमान्सचा बादशहा अशी नानाविध नावे ज्याची विशेषण म्ह्णून वापरली जातात, अशा शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आज 54 वा वाढदिवस आहे. आजवर शेकडो सिनेमांमधून त्याने आपला कोट्यवधींचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शाहरुखचे चित्रपट हा नुसता विषय जरी काढला तरी एक भली मोठी यादीच डोळ्यासमोर उभी राहते, यामध्ये त्याचे सिग्नेचर पात्र राहुल असलेले सिनेमे जरी वगळले तरी, बाझीगर मधला अजय शर्मा, पहेली मधला किशन, चक दे इंडिया मधील कबीर खान, मे हु ना मधील मेजर राम प्रसाद शर्मा, कल हो ना हो मधला अमन अशी न थांबणारी यादी सुरूच राहते. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण त्याचे असे दहा चित्रपट पाहणार आहोत ज्यातून शाहरुखच्या करिअरला यशाचे वळण लाभले.
'डर' पासून ते 'K3G' पर्यंतचे हे शाहरुख स्पेशल चित्रपट तुम्हाला एक नॉस्टॅलजिक सफर घडवून आणतील. तसेच शाहरुख ला खरंच बॉलिवूडचा बादशहा का म्हणतात याचेही उत्तर देऊन जातील.. त्यामुळे जर का तुम्ही शाहरुख फॅन असाल तर तुमच्यासाठी ही एक खास पर्वणीच असेल हे निश्चित.. काय मग तयार आहात ना.. चला तर पाहुयात शाहरुख खान चे हिट चित्रपट
डर

करन अर्जुन
दिल तो पागल है
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

देवदास
कल हो ना हो
में हू ना

बाझीगर

चक दे इंडिया
स्वदेश
दरम्यान शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे आजही सकाळपासून शाहरुखच्या घराबाहेर म्हणजेच मन्नत कडे त्याच्या फॅन्सनी धाव घेतली आहे. यंदा हे बर्थडे सेलिब्रेशन थोडे घरगुती असेल असे शाहरुखच्या पत्नीने म्हणजे गौरी खान हिने मीडियाला सांगितले होते. पण तरीही प्रत्येक जण आपल्या लाडक्या स्टारला शक्य त्या पद्धतीने शुभेच्छा देत आहे.