Pathaan Video: मनोरंजनविश्वात शाहरूखची 30 वर्षे पूर्ण, ‘पठाण’च्या रिलीज डेटसह शाहरुख खानचा नवा लूक प्रदर्शित
Pathan (Photo Credit - Twitter)

शाहरुख खानने (Shah Rukh Khan) बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने त्याने चाहत्यांना मोठ सरप्राइज दिलं आहे. त्याने आगामी 'पठाण' (Pathaan) या चित्रपटातील त्याच्या लूकचा टीझर (Look Teaser) शेअर केला आहे. यामध्ये शाहरुखने शर्ट आणि जीन्स घातली आहे. तो एका हातात बंदूक घेऊन दिसत आहे, त्याचे लांब केसही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि जखमा दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना त्याने इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना लवकर भेटल असे सांगितले आहे. शाहरुख खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, त्याने चित्रपटातून आपला पूर्ण चेहरा दाखवला आहे. याआधी रिलीज झालेल्या पोस्टर्स आणि टीझरमध्ये त्याचा लूक अजून दिसत नव्हता. शाहरुखचा हा रफ अँड टफ लूक खूपच आकर्षक दिसत आहे. त्याची पार्श्वभूमीही अतिशय प्रेक्षणीय दिसते. शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ एखाद्या मोठ्या सरप्राइज पेक्षा कमी नाही.

'पठाण'चे पोस्टर रिलीज करताना शाहरुख खान लिहिले की, '30 वर्षे... तुमचे प्रेम आणि स्मित असीम आहे. आता हा प्रवास 'पठाण'सोबत पुढे जाणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.’

Tweet

'पठाण'मध्ये सलमान खानचा कॅमिओ

शाहरुख खानने जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणचा हा व्हिडिओ देखील टॅग केला आहे. सिद्धार्थ आनंद 'पठाण'चे दिग्दर्शन करत आहे. यात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यात सलमान खानचा एक खास कॅमिओ देखील असणार आहे. तसेच शाहरुख सलमानच्या 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे. (हे देखील वाचा: Bhumi Pednekar समोर बॉलीवूड मधल्या आघाडीच्या अभिनेत्री पडल्या फिक्या, नवीन लूक आला समोर, पाहा थक्क करणारा अंदाज)

शाहरुख खानचे आगामी चित्रपट

शाहरुख खान तब्बल 5 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 2023 मध्ये तो 'पठाण', 'डंकी' आणि 'जवान'मध्ये दिसणार आहे. 2023 मध्ये त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.