कोरोना व्हायरसच्या लढाईत शाहरुख खानही पुढे सरसावला; PM, CM Fund ला मदत, साडेपाच हजार लोकांना जेवण, अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार
Shah Rukh Khan (Photo Credits: YouTube)

सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणू (Coronavirus) विरूद्ध लढाई लढत आहे. या लढ्यात प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार आर्थिक किंवा इतर प्रकारे मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना पीएम फंडाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अनेक लोक यासाठी पुढे आले व त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. आता यामध्ये शाहरुख खानने (Shah Rukh khan) लाखमोलाची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरुखने PM व CM Fund ला मदत, साडेपाच हजार लोकांना जेवण, अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार असल्याची घोषणा केली आहे.

शाहरुख खान ट्वीट -

शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेन्मेंटने (Red Chilli's Entertainment) सोशल मीडियावर ट्विट करत याची घोषणा केली आहे. आपल्या निवेदनात शाहरुख खानने लिहिले आहे की, त्याची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स पीएम केअर फंडला पैसे देईल. या फ्रँचायझीचे सह मालक जय मेहता आणि जूही चावलादेखील मदत करतील.

शाहरुख खान आणि गौरी खान महाराष्ट्र सीएम रिलीफ फंडालाही पैसे देणार आहेत. हे पैसे ते रेड चिलीज या कंपनीमार्फत देणगी म्हणून देतील. शाहरुख खान किती देणगी देईल याबाबत खुलासा करण्यात आला नाही.

पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंड व्यतिरिक्त हेल्थ केअर प्रोफेशनल्सला शाहरुख खान मदत करणार आहेत. शाहरुख खानची आयपीएल फ्रेंचायजी, केकेआर आणि एनजीओ मीर फाउंडेशन आरोग्य सेवा व्यावसायिकांना 50 हजार वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे उपकरणे पुरवणार आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या लढाईत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीची मोठी मदत; नर्स बनून करत आहे रुग्णांची सेवा, मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक (Photo)

याव्यतिरिक्त, शाहरुखचे मीर फाउंडेशन एक महिन्यासाठी मुंबईतील सुमारे 5500 कुटुंबांना दररोज भोजन देईल. तसेच स्वयंपाकघरही बांधले जाणार आहे, जिथे दोन हजार कुटुंबे व रुग्णालयांसाठी जेवण बनवले जाईल. तर अशा प्रकारे या निवेदनानुसार किंग खान आणि त्याच्या कंपन्या मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे मदतीसाठी काम करतील.