सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरुख आणि ऐश्वर्याला स्थान
शाहरुख खान आणि ऐश्वर्या बच्चन (File photo)

प्रसिध्द मासिक ‘एशियन जिओग्रॅफिक’ने प्रकाशित केलेल्या आशियामधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारतातील बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या बच्चन यांना स्थान मिळाले आहे. या यादीमध्ये भारतातील इतर क्षेत्रातील अनेक नामवंत लोकांची नावे सामील आहेत, ज्यामध्ये सेलेब्ज, कार्यकर्ते, क्रिकेटपटू आणि व्यावसायिक आहेत. मात्र चित्रपटसृष्टीमधील फक्त याच दोघांची या यादीमध्ये वर्णी लागली आहे.

नुकतेच ऐश्वर्याला चित्रपटसृष्टीमधील तिच्या योगदानाबद्दल ‘मेरील स्ट्रीप’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

या मासिकाकडून शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांना ‘अॅश्टॉनिशिंग एशिअंस’ या श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. तसेच या दोघांच्या फोटोला मासिकाच्या कव्हर पेजवरदेखील स्थान देण्यात आले आहे.

शाहरुख आणि ऐश्वर्याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, मुकेश अंबानी, अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन, उद्योगपती किरण मजूमदार शॉ आणि लेखिका अरुंधती रॉय यांची नावेदेखील या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

शाहरुख खानचा नवा चित्रपट  झीरो येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफदेखील आहेत. तर ऐश्वर्या अनुराग कश्यपच्या गुलाबजाममधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. बऱ्याच अवधीनंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांची जोडी या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे