Kangana Ranaut and Simi Garewal (Photo Credits: Twitter)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने बॉलिवूडमधील नेपोटिजम आणि कटकारस्थानांवर एक प्रकारचे बंडच पुकारले आहे. यात तिला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे. तर अनेकांनी तिच्या या बेताल वागण्याचा विरोध केला आहे. बॉलिवूडमध्ये ज्या कलाकारांना नेपोटिजमचा सामना करावा लागला त्यांनी आपले अनुभव सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. त्यात आता बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल (Simi Garewal)  यांनी देखील सोशल मिडियावर आपला अनुभाव व्यक्त केला आहे. यात तिने कंगनाने बॉलिवूडविरुद्ध छेडलेल्या लढाईचे कौतुक केले आहे.

सिमी गरेवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये असे सांगितले आहे, की "मी कंगना रनौत च्या धाडसाचे कौतुक करते, जी माझ्यापेक्षा कित्येक पटींनी साहसी आहे. कारण कोणी एका शक्तिशाली व्यक्तीने देखील माझे करिअर नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता हे माझं मला माहित. पण मी तेव्हा गप्प राहिले. मी कंगना इतकी धाडसी नव्हती." सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणावर कंगना रनौत हिचे मोठे वक्तव्य- 'माझी विधाने सिद्ध करु न शकल्यास पद्मश्री पुरस्कार परत करेन'

पाहा ट्विट:

सिमी गरेवाल यांनी पुढे असेही म्हटले आहे की, "बाहेरून आलेल्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये काय काय सहन करावे लागते याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी समजू शकते सुशांत सिंह राजपूतने काय काय सहन केले असेल. या सर्व गोष्टी बदलण्याची आवश्यकता आहे. "

सिमी गरेवाल यांना आशा आहे की, 'सुशांतचा मृत्यू बॉलिवूड मध्ये काही बदल घडवेल. जेव्हा अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाला होता तेव्हा सुद्धा जागृति निर्माण झाली होती. तसेच काहीसे सुशांतच्या निधनानंतर होण्याची मला आशा आहे. सिमी गरेवाल यांनी 'मेरा नाम जोकर, कर्ज या चित्रपटांत काम केले आहे.