मिका सिंह यांचे 2007 साली आलेले 'सावन में लग गई आग' (Sawan Mein Lag Gayi Aag) ह्या सुपरहिट झालेल्या गाण्याला रिमिक्स चा तडका देऊन एक वेगळ्याच अंदाज आपल्या भेटीला आले आहे. विक्रांत मेसी (Vikrant Messi) आणि यामी गौतम (Yami Gautam) यांचा 'गिन्नी वेड्स सनी' (Ginny Weds Sunny) या चित्रपटातील हे पार्टी साँग आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील हे जबरदस्त गाणे समोर आले आहे. खरे पाहता 12 वर्षांपूर्वी आलेल्या मिका सिंह च्या या गाण्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता या गाण्यात मिका सिंहसह (Mika Singh) बादशाह (Baadshah) आणि नेहा कक्कड़ (Neha Kakkar) यांनी या गाण्याला चार चांद लावले आहे.
हे एक पार्टी साँग असून यात यामीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळेल. त्यासोबत गायिका नेहा कक्कड़ हिने देखील थोडे ठुमके दिले आहेत. मोहसिन शेख आणि पायल देव यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर बादशाह ने या गाण्याचे रॅप केले आहे. Dream Girl Song Dhagala Lagali: रितेश देशमुख, आयुष्मान खुराना, नुसरत भरूचा यांच्या खास अंदाजात ड्रीम गर्ल सिनेमामधील 'ढगाला लागली..' चं रिमिक्स व्हर्जन रसिकांच्या भेटीला! (Watch Video)
या गाण्याला आतापर्यंत 1 लाख 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रेक्षकांनी देखील हे गाणे पसंतीस उतरत असून आतापर्यंत 23,000 हून अधिक लोकांनी हे गाणे लाईक केले आहे. तुमच्या पार्टीच्या उत्साह द्विगुणित होईल अशा पद्धतीचे संगीत या गाण्याला देण्यात आले आहे.