सुशील कुमार शिंदे यांच्या नातवासोबत सारा अली खानला झाला होता इश्क; नाजूक टप्प्यावर नात्याला पूर्णविराम
Sara Ali Khan | (Photo Credits: Instagram)

Sara Ali Khan Current Relationship Status: अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या भलतीच चर्चेत आहे. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ हे तिचे चित्रपट नुकतेच प्रेक्षांच्या भेटीला आले होते. या चित्रपटांच्या माध्यमातून तिने तिचे चाहते आणि प्रेक्षकांची मने बऱ्यापैकी जिंकली. नुकतंच तिने एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील काही घटनांचा उलघडा केला. त्यातील एक घटना म्हणजे तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्यासोबतचे तिचे रिलेशन. स्वत: सारानेच एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, आजवरच्या आयुष्यात तिने केवळ एकाच व्यक्तीवर प्रेम केले. हा व्यक्ती म्हणजे वीर पहाडिया (Veer Pahariya). त्यानेही आपल्याला कधी दुखावले नसल्याचे ती सांगते. वीर पहाडिया हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांचा नातू होय.

साराने फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 2016 मध्ये आपण वीर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होतो. त्या काळातील आमचे नाते खूपच चांगले राहिले. साधारण एक वर्षभर आम्ही एकमेकांना डेट केले. त्यानंतर आयुष्याच्या एका टप्प्यावर आनंदाने आम्ही आमच्या नात्याला पूर्वविराम दिला. आजवरच्या आयुष्यात मी केवळ वीरवरतीच प्रेम केले. आता मात्र, मी पूर्ण सिंगल आहे. कोणालाही डेट करत नाही. वीर पहाडिया याच्याबद्दल बोलताना त्याने आपल्याला कधीच दुखावले नसल्याचेही ती सांगते. (हेही वाचा, सारा अली खान 'या' आजाराने त्रस्त)

आपल्या बिनधास्थ आणि मनमोकळ्या स्वभावासाठी सारा ओळखली जाते. बऱ्याचदा आपल्या मनातील विचार ती कोणताही आडपडा न ठेवता जाहीरही बोलून दाखवते. काही दिवसांपर्वीच तिने कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर काही काळ ती बातम्यांचा विषय ठरली होती. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शीत झालेल्या ‘केदारनाथ’आणि ‘सिम्बा’ चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची चांगली वाहवा मिळवली. सध्या तिचे नाव सुशांत सिंह राजपुत याच्यासोबत जोडले जात आहे. मात्र, त्याबात ना सुशांतने ना साराने जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली.