सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत सारा अली खान दिसणार एका नव्या अवतारात, सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ
Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

मादक अदा आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व म्हणून जिचे नाव आवर्जून घेतले जाते ती म्हणजे अभिनेत्री मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan). आपल्या आई अमृता सिंग (Amruta Singh) प्रमाणे तिचेही बॉलिवूड जगतात आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे स्थान निर्माण करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागलय. अलीकडेच तिने केदारनाथ (Kedarnath) आणि सिम्बा (Simmba) चित्रपटात काम स्वत:ची अशी वेगळी छाप लोकांसमोर मांडली. मात्र चित्रपटांबरोबर जाहिरातींमध्ये साराची चलती सध्या पाहायला मिळत आहे. अलीकडेच तिने veet ब्रँडची जाहिरात केली होती. त्यानंतर आता ती एका नवीन सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत दिसणार आहे. यात ती Fiama Scent Body Wash Gel ची जाहिरात करताना दिसणार आहे.

या जाहिरातीत ती खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर ही या जाहिरातीची पोस्ट शेअर केली आहे. तसेच "आता साबणाला करा बायबाय आणि आणा  नवीन शॉवर जेलचा तुम्हाला सुगंधित अनुभव"असे या पोस्टखाली म्हटले आहे.

सारा अली खान लवकरच आपल्याला 'कुली नंबर 1' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती वरुण धवन सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग अजून सुरु झालेले नसून येत्या जुलै महिन्यापासून शुटिंगला सुरुवात होईल असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-अभिनेत्री सारा अली खान कार्तिक आर्यन नंतर आता 'या' बड्या कलाकारासोबत चित्रपटातून झळकणार

या आधी सारा रणवीर सिंह सोबत 'सिम्बा' या चित्रपटात दिसली होती. तसेच तिने सुशांत सिंग राजपूतसह 'केदारनाथ' या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती.