![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/10/1-Sapna-380x214.jpg)
बिग बॉस सीजन 11 (Bigg Boss Season 11) मध्ये बरीच चर्चेत आलेली हरयाणाची डान्सर सपना चौधरी (Sapna Chodhari) हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिला मुलगा झाल्याची बातमी ऐकून चाहते जितके आनंदी झाले तितकाच त्यांना धक्का देखील बसला. तिची ही गुड न्यूज ऐकून तिच्या चाहत्यांना तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या सपना चौधरीचे बाळ कसं असेल अशी अनेकांना उत्सुकता लागली होती. ती उत्सुकता आता संपली असून या बाळाचा पहिला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या बाळाचे गोंडस रुप पाहून अनेकांचा हृदय विरघळून गेले आहे.
मंगळवारी सपना चौधरी हिने एका गोंडस चिमुकल्याला जन्म दिला. हे ऐकून अनेकांना धक्का बसला की सपनाचे लग्न कधी झाले? कारण सपनाने याबाबत कधीही खुलासा केला नाही आणि कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. त्यामुळे अशा लोकांसाठी सपना बाळ होणे हा एक धक्काच होता.
मात्र या बाळाचा फोटो पाहून अनेकांची मनं विरघळली असून हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. निरागस डोळे, गोरा-गोबरा दिसणारा सपनाच्या मुलाचा फोटो चाहते फार पसंत करत आहे.
प्राप्त माहितीनुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सपनाने वीर साहू (Veer Sahu) नावाच्या कलाकाराशी लग्न केलं असून ते दोघेही आता आई-बाबा झाले आहेत. या बातमीनंतर लोकांनी सपना आणि वीरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर सपनाच्या नवऱ्याने स्वत: फेसबुक सेशन करून सपनाच्या वैयक्तिक जीवनावर प्रश्न विचारणाऱ्या ट्रोलर्सचा क्लास घेतला आहे.