Sapna Choudhary Blessed with Baby Boy: सपना चौधरी ने दिला मुलाला जन्म; लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना पती वीर साहूने दिलं 'असं' प्रत्युत्तर
हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरी (Sapna Choudhary) ने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाची लाट. मात्र, ही बातमी माध्यमात आल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आणि सपनाने अखेर कोणाशी आणि कधी लग्न केलं? अशा प्रश्नांचा भडीमार करणं सुरू केलं.
Sapna Choudhary Blessed with Baby Boy: हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरी (Sapna Choudhary) ने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाची लाट. मात्र, ही बातमी माध्यमात आल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले असून सपनाने अखेर कोणाशी आणि कधी लग्न केलं? अशा प्रश्नांचा भडीमार करणं सुरू केलं आहे. प्राप्त माहितीनुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सपनाने वीर साहू (Veer Sahu) नावाच्या कलाकाराशी लग्न केलं असून ते दोघेही आता आई-बाबा झाले आहेत. या बातमीनंतर लोकांनी सपना आणि वीरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर सपनाच्या नवऱ्याने स्वत: फेसबुक सेशन करून सपनाच्या वैयक्तिक जीवनावर प्रश्न विचारणाऱ्या ट्रोलर्सचा क्लास घेतला आहे.
बब्बू मान (Babbu Maan) या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या वीर साहू यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे की, 'एक कलाकार आहेत ज्यांनी कोणाचीही मदत न घेता अनेक गाणी रचली. त्यांनी चोरी किंवा दरोडा टाकला नाही. त्यांनी आता लग्न केलं असून ते वडील झाले आहेत. त्यामुळे कुणालाही त्यांच्या चारित्र्यावर शंका घेण्याचा अधिकार नाही.' (हेही वाचा - Wajid Khan Birthday: Salman Khan, Sohail Khan आणि Sajid Khan यांनी दिवंगत संगीतकार वाजिद खान च्या आठवणींना उजाळा देत कापला त्याचा बर्थ डे केक (Watch Video))
या व्हिडिओमध्ये वीर खूपचं रागावलेला दिसला आहे. वीरने त्याची थट्टा करणाऱ्यांना कडक इशारा दिला. एक कलाकार असल्याने त्यांला प्रचंड ट्रोल केलं जात आहे, जे खूप चुकीचे आहे. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे त्याचे आणि सपनाचे छुप्या पद्धतीने लग्न झाले. मात्र, याविषयी लोकांना जाहीरपणे काहीही सांगितले नाही, असंही वीरने सांगितलं आहे.
वीर साहू हा एक हरियाणी कलाकार आहे. त्याने आतापर्यंत अनेक पंजाबी आणि हरियाणी गाणी गायली आहेत. मात्र, दुसरीकडे आई झाल्यापासून सपनाने आपल्या सोशल मीडियावरून यासंदर्भात कोणतही वक्तव्य केलेलं नाही.
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2020 10:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

