Wajid Khan Birthday: Salman Khan, Sohail Khan आणि  Sajid Khan यांनी दिवंगत संगीतकार वाजिद खान च्या आठवणींना उजाळा देत कापला त्याचा बर्थ डे केक (Watch Video)
Wajid Khan Birth Anniversary | Photo Credits: Instagram

Wajid Khan  Birth Anniversary: बॉलिवूडने यंदाच्या वर्षी अनेक चमचमते हिरे गमावले आहे, त्यापैकी एक म्हणजे संगीतकार वाजिद खान (Wajid Kahan). कोरोना संकटकाळात 1 जून 2020 दिवशी वाजिदची झालेली अकाली एक्झिट अनेकांसाठी धक्कादायक आहे. मात्र आज (7 ऑक्टोबर) त्याच्या वाढदिवसादिवशी मात्र त्याचा भाऊ साजिद खान (Sajid Khan), बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) आणि सोहेल खानने (Sohel Khan) त्याचा बर्थ डे केक कापून त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काल रात्री उशिरा साजिदने त्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडीयामध्ये शेअर केला आहे.

साजिदने व्हिडिओ पोस्ट करताना ' हॅप्पी बर्थ डे वाजिद, एक महान संगीतकार, ग्रेट सोल आणि चांगला माणूस, माझा भाऊ मिस यू यार' अशी भावूक पोस्ट केली आहे. दरम्यान साजिदच्या या पोस्टच्या खाली बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Sajid Khan पोस्ट

वाजिद खानचा मृत्यू कोरोना संकटकाळात आजारपणात झालं. त्याला कोरोनाची लागण झाली होती. तसेच काही वर्षांपूर्वी त्याच्यावर किडनी प्रत्यारोपणाची देखील शस्त्रक्रिया झाली होती. वाजिदच्या निधनाची बातमी ही त्याच्या चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांसाठी, बॉलिवूड विश्वाला धक्का देणारी होती.

साजिद वाजिद या जोडीने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यांचा सलमान खान सोबतचा याराना देखील फार जुना आहे. 1998 साली 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमापासून त्यांच्या करियरला सुरूवात झाली आणि बघता बघता त्यांच्या करियरचा आलेख चढता राहिला. साजिद -वाजिद या जोडीने सलमानचं 'भाई-भाई' हे सिंगल संगीतबद्ध केले आहे. आणि तेच या जोडीचं शेवटचं गाणं ठरलं आहे.