अभिनेता संजय दत्त उपचारापूर्वी चित्रपट 'सड़क 2' चे पूर्ण करणार डबिंग
संजय दत्त (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची प्रकृती बिघडल्याने त्याला काही दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संजय दत्त याला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. सुत्रांच्या मते संजय दत्त आता उपचरासाठी विदेशात जाणार आहे. तर संजय याचा आगामी चित्रपट KGF-2 च्या शूटिंगमध्ये सुद्धा व्यस्त होता. याच दरम्यान त्याची तब्येत बिघडल्याने काही चित्रपट अडकून पडले आहेत. त्यामधीलच एक KGF 2 याचा सुद्धा समावेश आहे. संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोगाचे कळल्यावर तो आता अमेरिकेत उपचारासाठी दाखल होणार आहे. त्यामुळेच त्याने कामापासून ब्रेक घेत असल्याचे एका पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केले होते.

परंतु कामातून पूर्णपणे ब्रेक घेण्यापूर्वी संजय त्याचा आगामी चित्रपट संजय 'सड़क 2' चे डबिंग पूर्ण करणार असल्याचे बोलले जात आहे. सुत्रांच्या मते 'सड़क 2' च्या डबिंग संदर्भातील काम पुढच्या आठवड्यातच पूर्ण करणार आहे. संजयची तब्येत बिघडल्याचे कळताच त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आल्याने त्याने आनंद व्यक्त केला आहे.(Manyata Dutt Statement on Sanjay Dutt Lung Cancer: संजय दत्त च्या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी पत्नी मान्यता चे स्पष्टीकरण; म्हणाली ते जिंकूनच परत येतील)

गेल्या आठवड्यातच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने संजय दत्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. 11 ऑगस्टला त्याने उपचारासाठी कामापासून ब्रेक घेत असल्याची माहिती दिली. संजय दत्त किंवा त्यांच्या परिवाराने अद्याप अधिकृतपणे कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतु इंडस्ट्रीतील कोमल नाहटा यांनी ट्वीट करत संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता संजय दत्त याची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.