Sanjay Dutt gets Victory from Lung Cancer: संजय दत्त याची कॅन्सरवर मात, सोशल मीडियात केली 'ही' खास पोस्ट
संजय दत्त । Photo Credits: Yogen Shah

Sanjay Dutt gets Victory from Lung Cancer: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने कॅन्सवर यशस्वीपणे मात केली आहे. याच कारणास्तव संजू बाबाने आज सोशल मीडियात एक पोस्ट करत याबद्दल त्याच्या शुभचिंतकांना सांगितले आहे. संजय दत्त याने असे म्हटले की, या आजाराच्या विरोधात लढाई जिंकत परिवाराला एक मोठे गिफ्ट दिले आहे.(Lal Singh Chaddha: लाल सिंह चढ्ढा च्या शूटिंग दरम्यान आमिर खान याला दुखापत, औषध घेत अभिनेत्याने पूर्ण केले सिनेमाचे चित्रीकरण)

संजय दत्त याने एक पोस्ट करत त्यात असे लिहिले आहे की, मी ही आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझे हृदय कृतज्ञतेने भरले आहे. तसेच माझ्यासाठी आणि परिवारासाठी गेले काही आठवडे हे मुश्किल होते. देव हा सर्वाधिक मुश्किल लढाई सुद्धा हुशार शिपायांना देतो. आज मुलाच्या वाढदिवसानिमित्त हे सांगताना मला खुप आनंद होत आहे. या युद्धात मी विजयी झालो आहे. माझ्या परिवाराचे सुख आणि त्यांच्या आरोग्यासाठी एक मोठे गिफ्ट आता मी देऊ शकलो आहे.

संजय दत्त याने पुढे असे म्हटले आहे की, तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर हे सर्वकाही साध्य झाले आहे. मी माझ्या परिवारासह मित्र आणि चाहत्यांचे आभार मानतो. जे माझ्यासोबत या कठीण काळात माझ्यासोबत उभे होते. तुमचे प्रेम, दया आणि तुमच्या प्रार्थना ज्या तुम्ही माझ्यापर्यंत पोहचवल्यात त्यासाठी आभार.(कॅन्सर सोबत संघर्ष करत असलेला Sanjay Dutt या महिन्यापासून सुरु करणार KGF चे शूटिंग, इंन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती)

आपल्या डॉक्टरांच्या प्रति संजय दत्त याने आभार व्यक्त करत म्हटले की, मी खासकरुन डॉक्टरस सेवंती आणि तिची टीमसह कोकिलाबेन स्टाफचे ही धन्यवाद मानतो. ज्यांनी माझी गेल्या काही दिवसात काळजी घेतली. विनम्र आणि आभारी.