Sanak Hollywod Remake: विद्युत जामवालच्या 'सनक'चा बनत आहे हॉलीवूडमध्ये रिमेक; चित्रपटाच्या राईट्ससाठी निर्मात्यांकडे चौकशी- Report
Sanak (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलीवूडचा फिटनेस फ्रीक अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) त्याच्या चित्रपटांमधील अ‍ॅक्शन सिन्समुळे चर्चेत असतो. विद्युत जामवालला सिने उद्योगातील मार्शल आर्ट तज्ञ देखील म्हटले जाते. विद्युत सारखे अ‍ॅक्शन सीक्वेन्स बॉलीवूडमधील इतर कोणते अभिनेते क्वचितच करू शकतात आणि हाच विद्युतचा प्लस पॉइंट मानला जातो. विद्युतने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत फार कमी चित्रपट केले असतील, पण त्याने जितके चित्रपट केले त्या सर्वांमध्ये त्याच्या अभिनयाला खूप प्रशंसा मिळाली.

याआधी विद्युतने त्याच्या 'क्रॅक' या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. आता बातमी आली आहे की, हॉलिवूडमध्ये विद्युतच्या चित्रपटाचा रिमेक करण्याची योजना आखली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या विद्युतच्या 'सनक' (Sanak) चित्रपटाच्या निर्मात्यांना हॉलिवूडकडून एक ऑफर आली आहे. या ऑफरद्वारे त्यांना हॉलिवूडच्या एका निर्मात्याने संपर्क केला आहे. हे निर्माते विद्युतचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'सनक'चा रिमेक बनवू इच्छित आहेत.

सनकचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांना हॉलिवूड चित्रपट निर्माते कायलन टायिंग (Kylan Tying) यांनी हा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात कायलन यांनी अमेरिकेत 'सनक'चा रिमेक करण्यासाठी रस दाखवत त्याबाबत पुढील माहिती मागवली आहे. कायलन हे एक यशस्वी हॉलीवूड निर्माते-दिग्दर्शक आहेत. त्यांनी 'लॉस्ट अँड फाउंड', 'गिगलबट' सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. (हेही वाचा: Best Indian Films: सत्यजित रे यांचा Pather Panchali ठरला आतापर्यंतचा 'सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट'; टॉप 10 मध्ये Sholay ला स्थान, जाणून घ्या यादी)

या प्रस्तावाबाबत बोलताना विपुल शाह म्हणाले, 'हा मेल आणि चौकशी माझे दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत मी खूप उत्सुक आहे. माझ्या आयुष्यातील हा एक विलक्षण योगायोग आहे की माझा पहिला चित्रपट आंखेची देखील हॉलीवूडमधून चौकशी करण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. एक प्रॉडक्शन हाऊस म्हणून हा एक अविश्वसनीय सन्मान आहे.’