बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) गेल्या अनेक वर्षांपासून ईद (Eid) निमित्त सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणतो. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे यंदा सलमान खानच्या या संकल्पनेला ब्रेक लागला आहे. ईद 2020 निमित्त सलमानचा राधे- द मोस्ट वॉन्टेट भाई (Radhe) हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. या सिनेमाचे बहुतांश शूटिंग देखील झाले होते. मात्र कोविड 19 संकट आणि लॉकडाऊन यामुळे सर्वच योजना बारगळल्या. शूटिंग रद्द झाले, सिनेमाघरं बंद झाली. त्यामुळे यंदा ईद निमित्त बॉक्स ऑफिसवर धमाल होणार नाही. असे असले तरी सलमान आपल्या चाहत्यांना निराशा करणार नाही.
ईदनिमित्त सलमान खानचा राधे सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार नसला तरी सलमान नवे गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ईद निमित्त प्रेक्षकांना सिनेमाद्वारे खास गिफ्ट देण्याची परंपरा यंदाही सलमान चालू ठेऊ इच्छित आहे. त्यामुळे सिनेमा नसला तरी तो नवे गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सलमान खान यंदा गाण्याद्वारे प्रेक्षकांना ईदी देणार आहे. मात्र या गाण्याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. (Tere Bina Song: सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस चं लॉकडाऊन दरम्यान फार्म हाऊसवर शूट केलेलं नवं रोमॅन्टिक गाणं रसिकांच्या भेटीला!)
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सलमान खान आपल्या गाण्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 'प्यार करोना' हे कोरोना व्हायरसवरील गाणे सादर करत त्याने आपल्या युट्युब चॅनलचा शुभारंभ केला. त्यानंतर 'तेरे बिना' या गाण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता सलमान खानचे नवे गाणे कोणते असणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.