Tere Bina Song: सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस चं लॉकडाऊन दरम्यान फार्म हाऊसवर शूट केलेलं नवं रोमॅन्टिक गाणं रसिकांच्या भेटीला! (Watch Video)
Tere Binqa Song | Photo Credits: Youtube/ Salman Khan

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये पनवेलच्या अर्पिता फार्म हाऊसवर अडकलेल्या सलमान खानने जॅकलिन फर्नांडीस सोबतचा Tere Bina गाण्याचा शूट केलेला व्हीडिओ नुकताच सोशल मीडीयावर रीलीज केला आहे. लॉकडाऊन असल्याने शूटिंग आणि इतर सारे व्यवहार ठप्प असल्याने सलमानने त्याच्या मित्रमंडळींसोबत लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा वापर करत काही गाणी बनवून, गाऊन, शूट करून रिलीज करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यापैकी हे एक गाणं तेरे बिना! आज ट्वीटरवर सलमान खानने हे गाणं लॉन्च करताना त्याच्या चाहत्यांनाही घरच्या घरी हे गाणं रिक्रिएट करून त्याला टॅग करण्याचं आवाहन केलं आहे. Pyar Karona Song ने सलमान खान याच्या युट्यूब चॅनलचा शुभारंभ; सलमानच्या आवाजातील Coronavirus Pandemic वरील गाणे चाहत्यांच्या भेटीला (Watch Video).

 

तेरे बिना गाण्याच्या रोमॅन्टिक व्हीडिओमध्ये सलमान सोबत केवळ जॅकलिन फर्नांडीसची झलक पहायला मिळते. यामध्ये दोघांची घोडेस्वारी, बाईक राईड, स्विमिंग पूलमधील डूबकी ते अगदी मावळत्या सूर्याच्या साक्षीने घट्ट मिठी अशा वेगावेगळ्या मूडसची झलक पहायला मिळते. तेरे बिना हे गाणं सलमान खानने स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केले आहे. तर हे गाणं अजय भाटीयाने संगीतबद्ध केले असून शब्बीर अहमदचे शब्द आहेत. तर लवयात्रीचा दिग्दर्शक अभिराज मिनावाला याचं नाव या व्हिडिओमध्ये असोसिएट डिरेक्टर म्हणून देण्यात आलं आहे.

Tere Bina गाणं 

सलमान खानने तेरे बिना पूर्वी प्यार करोना हे गाणं रिलीज केलं आहे. दरम्यान सध्या लॉकडाऊनमधील त्याच्या गाण्याचे व्हिडिओ लॉन्च करण्यासाठी त्याने युट्युबवर Salman Khan हे नवं युट्युब चॅनल लॉन्च केले आहे.

Shilpa Shetty ने सांगितले Surrogacy स्वीकारण्याच कारण ; 'या' आजारामुळे होत होते गर्भपात - Watch Video

येत्या काही दिवसांत जी गाणी सिनेमांमध्ये जाऊ शकत नाहीत त्यांना या युट्युब चॅनलच्या माध्यमातून रीलीज करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. दरम्यान 24 मार्च ला जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा सलमान त्याची बहीण अर्पिता आणि कुटुंबासह फार्म हाऊस होता. मागील दोन महिन्यांपासून तो काही कलाकारांसोबत तेथेच आहे.