लॉकडाऊनमुळे सलमान खान (Salman Khan) आपल्या पनवेल मधील हार्महाऊसवर अडकला आहे. दरम्यान हार्महाऊसवरील अनेक गंमती जमती सलमान आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. याच दरम्यान Coronavirus Pandemic वरील हटके गाणे सलमानने गायले आहे. 'प्यार करोना' (Pyar Karona) या गाण्यासह त्याने आपल्या युट्युब चॅनलचा शुभारंभ केला आहे. काल या गाण्याची एक झलक चाहत्यांच्या भेटीला आली होती. आज संपूर्ण गाणे भेटीला आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ सलमान खान याने सोशल मीडियावर शेअर केला असून या गाण्याद्वारे युट्युब चॅनलची सुरुवात झाली आहे. तसंच 'माझे नवीन गाणे पहा आणि एन्जॉय करा' असा मेसेज लिहित त्याने गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. (सलमान खान याच्या Coronavirus वरील 'प्यार करोना' गाण्याची झलक)
'प्यार करोना' हे गाणे सलमान खान याने लिहिले असून साजिद-वाजिद (Sajid-Wajid) यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे Coronavirus Pandemic वर असून याद्वारे लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना संदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर या कठीण काळात काय करावे हे देखील गाण्यातून सांगण्यात आले आहे. तसंच कठीण वाटत असला तरी केवळ लॉकडाऊनच तुम्हाला या संकटातून वाचवू शकतो, असा मोलाचा संदेश गाण्यातून देण्याचा सलमानचा हा प्रयत्न नक्कीच हटके आहे.
सलमान खान सॉन्ग व्हिडिओ:
Finally hamara YouTube channel shuru ho gaya hai, jaiye aur mera naya gaana dekhen aur enjoy karein. #PyaarKaronahttps://t.co/ihrH8607yB@SajidMusicKhan @wajidkhan7 @adityadevmusic @hussainthelal @abhiraj21288 #SaajanSingh
#StayHome #Lockdown #NewMusic #IndiaFightsCorona
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 20, 2020
सलमान खान याच्या या गाण्याला चाहते उत्तम प्रतिसाद देतील यात वाद नाही. मात्र यापुढे सलमानच्या युट्युब चॅनलवर काय पाहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. तसंच सलमान खान याने कोरोना व्हायरसच्या या संकटात सिनेक्षेत्रात काम करणार्या कामगारांना आर्थिक मदत केली असून अनेकदा आपल्या हटके स्टाईलमध्ये सुरक्षित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.