Salman Khan त्याचा 54 वा Birthday साजरा करणार 'या' व्यक्तीसोबत
Salman Khan (Photo Credit: Instagram)

Salman Khan Birthday Special: सलमान खानचा वाढदिवस अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे भाईजानच्या वाढदिवशी, त्याचे सर्व चाहते आणि मीडियातील लोक सलमानला भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बांद्रा येथील घरी म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचतात. खरं तर, सलमानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सर्वात भव्यदिव्य करण्यात येते आणि त्याच्या या खास दिवशी इंडस्ट्रीतील त्याचे जवळचे मित्र त्याला भेटायला येतात. पण दुर्दैवाने, या वर्षी असे काही घडणार नाही असे दिसतंय. कारण सलमाननेच त्याचा वाढदिवशी जास्त सेलिब्रेशन नाही करायचे असं ठरवलं आहे.

दबंग अभिनेता लवकरच 54 वर्षांचा होणार आहे आणि मिस मालिनीच्या वृत्तानुसार सलमान आपला खास दिवस त्याची गर्भवती बहीण अर्पिता खान शर्मा हिच्यासोबत आणि आपल्या कुटुंबासमवेत साजरा करण्याचा  विचार करत आहे. नुकत्याच एका मनोरंजन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सलमानने आपल्या 54 व्या वाढदिवशी काय करणार याचे प्लॅन्स शेअर केले आहेत.

सलमान म्हणाला, “माझ्या वाढदिवसाचे काहीही प्लॅन्स मी केलेले नाहीत. माझी बहीण अर्पिता गर्भवती आहे, म्हणून मी तिच्याबरोबर वेळ घालवणार आहे.”

Salman Khan अखेरपर्यंत करणार Bigg Boss 13 चं होस्टिंग; पाहा काय म्हणाला सलमान शो सोडण्याबद्दल आणि कमी झालेल्या मानधनाबद्दल

त्याच्या इंडस्ट्रीतील सध्याच्या प्रोजेक्ट्स बद्दल बोलायचं झालं तर, सलमान खान सध्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे, कारण त्याचा आगामी चित्रपट दबंग 3,  20 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केलं असून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रज्जोच्या भूमिकेत दिसेल तर अभिनेत्री सई मांजरेकर खुशीची भूमिका साकारणार आहे.