Khan vs Journalist: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan Gets Relief) आणि त्याच्या अंगरक्षाकाला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलासा दिला आहे. सलमान खान याचे छायाचित्र काढणाऱ्या पत्रकाराला माराहण करणे आणि त्याता फोन हिसकावून घेतल्याद्दल दाखल प्रकरणात (Journalist Assault Case) कोर्टाने (Mumbai High Court) आज निकाल दिला. कोर्टाने सलमान खान याच्यावर सुरु असलेला खटला रद्द केला आहे. पत्रकाराने सलमान खान याच्यावर आरोप केला होता की, सलमानने त्याच्याशी असभ्य वर्तन केले. तसेच, त्याला मारहाण केली आणि त्याचा मोबाईल हिसकावला.
पत्रकाराशी असभ्य वर्तन केले प्रकरणी दाखल खटल्यावर अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्ट काय निर्णय देते याबाबत उत्सुकता होती. या प्रकरणात कोर्टाने सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाला समन्सही बजावले होते. ज्याला सलमानने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालायने 23 मार्च रोजी सुनावणी पूर्ण करुन आपला निर्णय राखून ठेवला होता. (हेही वाचा, Jee Rahe The Hum Song Out: पूजा हेगडेच्या प्रेमात पडला सलमान खान; 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील नवीन गाणं 'जी रहे थे हम' प्रदर्शित, Watch)

उच्च न्यायालायाच्या न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवत म्हटले होते की, प्रत्येकाला आपले खासगी जीवन आहे. मग तो न्यायाधीश, वकील असो की अभिनेता. कायद्यापुढे सर्व समान असतात आणि कायद्यापेक्षा वरचढ कोणच असत नाही. ना की कलाकार अथवा पत्रकारही. सर्वांना कायद्याचे पालन करावेच लगते.
आरोप काय होते?
अभिनेता सलमान खानने त्याच्या अंगरक्षकांसह मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना एका पत्रकाराचा मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचा आरोप होता. मीडिया कर्मचार्यांनी त्यांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केल्यावर ही घटना घडली. अभिनेत्याने कथितपणे वाद घातला आणि पत्रकाराला धमकी दिली.
ट्विट
Bombay High Court quashes a case against actor SALMAN KHAN & his bodyguard accused of snatching a journalist's phone and for unruly behaviour while the scribe attempted to take a picture of the actor cycling on a Mumbai-street.@BeingSalmanKhan #SalmanKhan pic.twitter.com/DvRkIE8jaU
— Live Law (@LiveLawIndia) March 30, 2023
खटल्यादरम्यान सलमानच्या वकिलाकडून न्यायालयाला सांगण्यात आले की पत्रकार यापूर्वी पोलिसांकडे गेला होता आणि त्याने फक्त त्याचा फोन घेतल्याचा आरोप केला होता. मात्र हल्ल्याबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते. नंतर, त्याने न्यायदंडाधिकार्यांसमोर तक्रार दाखल केली तेव्हा त्याने मारहाणीचाही कथित उल्लेख केला.