सलमान खान विनापरवानगी सेल्फी खेचणार्‍या व्यक्तीवर भडकला; फोन हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल!
Salman Khan (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानला (Salman Khan) कधी आणि कशाचा राग येईल याचा काही नेम नाही. गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टवर (Goa International Airport )सलमान खान सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणार्‍या एका व्यक्तीचा सलमान खान मोबाईल खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे आता सलमान खानच्या रागाची पुन्हा चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. सलमान खानची विना परवानगी 'सेल्फी' (Selfie) घेणारा व्यक्ती पाहून त्याचा राग अनावर झाला आणि त्या व्यक्तीचा फोन हिसकावून सलमान दरवाज्यातून बाहेर पडलेला दिसला आहे. सलमान खान चे अनोख्या अंदाजातील हे वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क.

सलमान खानने अनेक मुलाखतींमध्ये त्याचं फॅन्ससोबत असलेल्या नात्याच्या संबंधांबद्दल संगितलं आहे. सलमान खानला त्याच्या परवानगीशिवाय फोटो काढणं पसंत नाही. त्यामुळे गोवा विमानतळावरदेखील सलमान खानच्या परवानगीशिवाय फोटो काढणार्‍या एका व्यक्तीच्या हातातून फोन घेऊन सलमान रागात पुढे गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

जेव्हा सलमान खानला राग येतो

सलमान खान लवकरच आगामी सिनेमा 'राधे' मधून रसिकांच्या भेटीला येईल. या सिनेमामध्ये जॅकी श्रॉफ, गौतम गुलाटी, दिशा पटानी हे कलाकार झळकणार आहेत. तर यावर्षी रसिकांना ईदी म्हणून 'कभी ईद कभी दिवाली' हा सिनेमा घेऊन तो रसिकांसमोर येणार आहे. या सोबतच सलमान खान सध्या 'बिग बॉस 13' या रिएलिटी शोचं देखील सूत्रसंचलन करत आहे. या शोमध्येही सलमान स्पर्धकांची 'शाळा' घेताना दिसतो.