कभी ईद कभी दिवाली! सलमान खानचा 2021 मधील नवा चित्रपट होणार ईदच्या दिवशी रिलीज
Salman Khan on Bigg Boss 13 (Photo Credits: Voot)

बॉलिवूडच्या भाईजानने म्हणजेच सलमान खानने त्याचा पुढील चित्रपट जाहीर केला असल्याने त्याचे सर्व फॅन्ससाठी आम्ही एक खुशखबर घेऊन आलो आहोत. 'कभी ईद कभी दिवाली' असे नाव देण्यात आलेला हा चित्रपट साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत सलमान करणार आहे. त्याच्या नुकत्याच हिट ठरलेल्या दबंग 3 या चित्रपटाचं यश सेलिब्रेट करत असणाऱ्या सलमानला आपल्या नव्या चित्रपटाची बातमी जास्त वेळ लपवून ठेवता आली नाही असे दिसत आहे कारण त्याने नुकतंच त्याबद्दल सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे. 2021 या वर्षातील ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट येणार असल्याचे बोललं जात आहे.

सल्लूचा हा आगामी चित्रपट कॉमेडी असणार असल्याची चर्चा आहे.. सलमान आणि साजिद यांनी केलेल्या ट्विटमध्ये फक्त चित्रपटाचे शीर्षक आणि रिलीजची तारीख सांगण्यात आली असून अद्याप काहीही ठोस माहिती मिळालेली नाही. सलमानने या नव्या चित्रपटाची घोषणा ऑनलाईन केल्यापासूनच चाहते खुअपच उत्साही झाले आहेत आणि त्याचा चित्रपट ईदला येणार असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

दरम्यान, यावर्षी सलमान खान राधे: युवर मोस्ट वांटेड भाई या सिनेमाच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो दिशा पटानी सोबत दिसणार आहे. हा चित्रपट प्रभुदेवा यांनी दिग्दर्शित केला आहे.