बॉलिवूडचा दबंगस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या खाजगी ड्रायव्हर आणि 2 स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्यानंतर सलमान सह खान कुटुंब सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. दरम्यान सलमान खानचा ड्रायव्हर अशोक आणि त्याच्या स्टाफमधील दोघा जणांना कोविड 19 (COVID 19) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई मधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Bombay Hospital) त्यांना कोविड 19 वरील उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे. यामुळे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी देखील पुढील 14 दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये (Self Isolation) राहण्याचा निर्णय घेतला आहे. असे वृत्त पिंकविला ने दिले आहे.
महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर झाला आहे. सुरूवातीच्या काळात सलमान खान संपूर्णवेळ पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवरच राहिला. त्यानंतर जसे शूटिंगला सुरूवात झाली तसा तो बिग बॉस 14 च्या सूत्रसंचलनासाठी आणि राधे या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईमध्ये परतला होता. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी Salman Khan ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले 'हे' 3 मंत्र केले शेअर.
दरम्यान पिंकविला पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान त्याच्या स्टाफला उत्तम उपचार मिळतील याची खबरदारी घेत आहे. तसेच तो स्वतः आयसोलेशनमध्ये आहे. सध्या सलमान विकेंड का वार च्या शूटिंगसाठी बाहेर पडणार का? याबद्दल ठोस माहिती देण्यात आलेली नाही.