Tere Bina Teaser (Photo Credits: YouTube)

लॉकडाऊन मुळे जैकलीन फर्नांडिस, यूलिया वंतूर देखील बॉलिवूडच्या दबंग सलमान खान आणि त्याच्या परिवारासह राहात आहेत. लॉकडाऊन मध्ये सलमान आणि त्याचा मित्र परिवार वेगवेगळा व्हिडिओ आपल्या फॅन्ससह शेअर करत आहेत. लोकांनी घरी राहण्यासंदर्भात, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भातील व्हिडिओ ही मंडळी शेअर करत आहेत. यासह अलीकडेच जॅकलीनने सलमानच्या फार्मवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात सलमान (Salman Khan) आणि जैकलीन (Jacqueline Fernandez)  हे दोघे एका गाण्यामध्ये दिसणार आहे असे सांगितले होते. त्या गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला आहे. तेरे बिना असे या गाण्याचे नाव आहे.

या गाण्याच्या टीजरमध्ये सलमान आणि जैकलीनची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. 30 सेकंदाच्या या प्रोमो मध्ये तुम्हाला सलमानचा आवाज देखील ऐकायला मिळेल. Lockdown: लॉकडाउन काळात भारतातील लोक सनी लिओनी, प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफ या अभिनेत्रींना करत आहेत सर्च

पाहा 'तेरे बिना' चा टीजर

 

हा व्हिडिओ शेअर करुन सलमानने आपल्या चाहत्यांना मदर्स डे च्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

याआधी सलमानने सोशल मिडियावर आपला एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात वलूशा डिसूजा सलमान आणि जैकलीनची मुलाखत घेत होती. तेव्हा त्यांनी या गाण्याविषयी सांगितले होते.

तेव्हा सलमानने सांगितले की 'हे गाणे माझ्या डोक्यात होते. त्यामुळे विचार आला की या गाण्याला यावेळीच लाँच करुया. हे गाणे आम्ही 4 दिवसात शूट केले असून यासाठी आम्ही केवळ 3 लोकांची मदत घेतली आहे.'