
Lockdown: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. आतापर्यंत तीनवेळा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. भारतातील लोक लॉकडाउनच्या काळात इंटरनेटवर काय सर्च करतात यावर एक संशोधन करण्यात आलं आहे. SEMrush या कंपनीने यासंदर्भात संशोधन केलं आहे.
या संशोधनात भारतातील लोक लॉकडाउनच्या काळात सनी लिओनी, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ या अभिनेत्रींना सर्च करत असल्याचं समोर आलं आहे. SEMrushने केलेल्या संशोधनानुसार, गेल्या एप्रिल महिन्यात इंटरनेटवर दररोज तब्बल 39 लाख वेळा सनी लिओनीला सर्च करण्यात आलं आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा असून प्रियंकाला 31 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. तसेच यात तिसऱ्या क्रमांकावर कतरिना असून तिला 19 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. (हेही वाचा - Mothers Day 2020: 'मदर्स डे' निमित्त बॉलिवुड अभिनेता आयुषमान खुराना ने तयार केलं खास गाणं; पहा व्हिडिओ)
दरम्यान, पुरुष सेलिब्रिटींमध्ये सलमान खान, विराट कोहली आणि हृतिक रोशन यांना मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलं आहे. सलमान खानला 21 लाख, विराट 20 लाख आणि हृतिक 13 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. याशिवाय दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, दिशा पटानी, सारा आली खान, करिना कपूर, श्रद्धा कपूर या अभिनेत्रींना ही मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आलं आहे.