Salman Khan Radhe Movie (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) या वर्षी ईदला 'राधे: द मोस्ट वांटेड भाई' (Radhe) हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत होता. मात्र कोरोना व्हायरस मुळे फिल्मचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यामुळे हा चित्रपट ईदला प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे सलमानच्या अनेक फॅन्सची घोर निराशा झाली होती. मात्र आता अनलॉक 2 (Unlock 2) च्या टप्प्यात हळूहळू चित्रपटांचे शूटिंग करण्यास सुरुवात होत आहे. याच धर्तीवर सलमानने देखील लवकरात लवकर या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधे  चित्रपटाची केवळ 2 आठवड्यांची शूटिंग बाकी आहे. त्यामुळे सलमानने महत्त्वाच निर्णय घेतला आहे.

रिपोर्ट नुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांना बांद्रयाचे मेहबूब स्टुडिओ बुक केले आहे. जेणेकरून ऑगस्टच्या शेवटपर्यंत हे शूटिंग पूर्ण होईल. मिड डे ने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान, अतुल अग्निहोत्री आणि दिग्दर्शक प्रभुदेवा ने या गोष्टीवर जोर दिला की, कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाचे शूटिंग लवकर पूर्ण केले जाईल, ते ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करता. यासाठी संपूर्ण 1 महिना मेहबूब स्टुडिओ बुक कऱण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- 'राधे'ला टक्कर द्यायला सज्ज झालाय हा अभिनेता; याआधीही Salman Khan सोबत केलंय काम

सांगण्यात येत आहे की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाईल. असेही सांगितले जात आहे की, सलमान खानचा 'राधे' हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्म वरही प्रदर्शित होऊ शकतो. त्याची टीम OTT प्लॅटफॉर्मशी याविषी चर्चा करत आहेत. जेणेकरुन खूप चांगला करार होऊ शकेल. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

सलमान सोबत याआधीही 2 सिनेमामध्ये काम केलेला अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असल्याचं उघड झालं आहे. याआधी त्याने 'किक' मध्ये पोलीस अधिकाऱ्याची तर 'सुलतान' मध्ये ट्रेनरची भूमिका केली होती. याबाबत बोलताना सिनेमाशी निगडित एक सूत्र म्हणाले,''रणदीप या सिनेमात खलनायक साकारत आहे. अशा प्रकारची भूमिका त्याने आधी केलेली नाहीये. हा त्याचा पहिला अनुभव असणार आहे.