Saiee Manjrekar Glam Look: महेश मांजरेकर यांची मुलगी 'सई' दबंग 3 मधून बॉलीवूडमध्ये करत आहे पदार्पण; पहा तिचे ग्लॅमरस फोटो
सई मांजरेकर (Photo Credit : Yogen Shah)

महेश मांजरेकर.. मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक नावाजलेले नाव. दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून अतिशय उत्तम चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले. आता त्यांची मुलगी ‘सई मांजरेकर’ (Saiee Manjrekar) बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दबंग 3’ (Dabangg 3) मधून सई चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून सई किती सुंदर आणि सोज्वळ आहे हे आपण पहिलेच, मात्र त्याचप्रकारे ती प्रचंड ग्लॅमरसदेखील आहे. सध्या सईचे अनेक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अगदी भल्या भल्या अभिनेत्रींना लाजवेल असे तिचे व्यक्तिमत्व आहे. चला एक नजर टाकूयात सईच्या काही फोटोंवर

सई मांजरेकर (Photo Credit : Yogen Shah)

महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर या दांपत्याची धाकटी मुलगी म्हणजे सई मांजरेकर. आश्विनी मांजरेकर आणि सत्या मांजरेकर अशी तिची भावंडे आहेत. सध्या सईचे वय फक्त 21 वर्षे असून, तिचा जन्म 29 ऑगस्ट 1998 रोजी मुंबई येथे झाला.

 

 

View this post on Instagram

 

Eid-Al-Adha Mubarak

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

सईला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनय यांची आवड होती. अशात घरातच तिला महेश मांजरेकर यांच्याकडून बाळकडू मिळाले. आता सई दबंग 3 मधून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. सई या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

IIFA 2019 my first ever award show with none other than @beingsalmankhan 🙏🏻 Surreal experience, forever grateful

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

याआधी सई मेघा मांजरेकर यांच्यासोबत काकस्पर्श चित्रपटात दिसली होती. महेश मांजरेकर आणि सलमान खान यांची मैत्री सर्वपरिचित आहेच, अशात सईला दबंग 3 मध्ये संधी दिल्याने हे संबंध अजूनच वृद्धिंगत होतील. (हेही वाचा: IIFA 2019 च्या ग्रीन कार्पेटवर सलमान खान सोबत महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरची एंट्री; 'दबंग 3' सिनेमात दिसणार एकत्र)

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

दरम्यान, दबंग 3 मध्ये सलमान खान चुलबुल पांडे या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.सोबत सोनाक्षी सिन्हा आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता किच्चा सुदीप यांची प्रमुख भूमिका असणार आहे. प्रभदेवा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या 20 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.