IIFA 2019 च्या ग्रीन कार्पेटवर सलमान खान सोबत महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरची एंट्री; 'दबंग 3' सिनेमात दिसणार एकत्र
Salman Khan and Saiee Manjrekar (Photo Credits: Yogen Shah)

मुंबईमध्ये काल ( 19 सप्टेंबर) च्या रात्री IIFA 2019 चा यंदा 20 वा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चांद लावले. माधुरी दीक्षित, कॅटरिना कैफ, सारा अली खान, प्रीती झिंटा, रणवीर सिंह यांच्यासह अनेक स्टार्सच्या उपस्थितीने आणि सेलिब्रिटींच्या दमदार परफॉर्म्न्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र सर्वात चर्चेत राहिली ती सलमान खान (Salman Khan)  सोबत आयफाच्या ग्रीन कार्पेटवर अवतरलेली तरूणी ! सलमान खान कॅटरिना कैफ, लुलीया वैंतूर किंवा त्याच्या जवळच्या काही व्यक्तींसोबत अशा सोहळ्यामध्ये येतो. मात्र यंदा तो सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सोबत आयफामध्ये आला होता. सलमान खानच्या आगामी 'दबंग 3' या सिनेमात त्याच्यासोबत सई मांजरेकर विशेष भूमिकेत दिसणार आहे. सई मांजरेकर ही मराठी अभिनेते, दिगदर्शक, सिने निर्माते महेश मांजरेकर यांची लेक आहे.

यंदा आयफाच्या ग्रीन कार्पेटवर सई मांजरेकर आणि सलमान खान ही जोडी अनेकांचं लक्ष वेधून घेत होती. फ्लोरोसंट कलर्सच्या खास लेहंगा-चोलीमध्ये सई आली होती. सलमान खान सोबत आत्मविश्वासाने वावरणार्‍या सईने हा अनुभव खूपच सुखद असल्याचंही आपल्या ट्वीटर अकाऊंटवर म्हटलं आहे.  अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जांभळ्या गाऊन मधील हॉट अवतार बघून पती रणवीर सिंह झाला घायाळ, दिली अशी हटके प्रतिक्रिया

सलमन खानचा 'दबंग 3' हा सिनेमा डिसेंबर 2019 मध्ये रीलिज होणार आहे. या सिनेमामध्ये सोनाक्षी आणि सलमान ही जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. मात्र सई देखील एका खास भूमिकेत झळकणार आहे. तिच्या 'दबंग 3' मधील लूक बद्दल सिनेमाच्या टीमकडून खास गुप्तता पाळण्यात आली होती. अखेर आयफा पुरस्कार सोहळ्यात तिची खास झलक पहायला मिळाली. 'दबंग 3' सिनेमातून सई बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रभूदेवा यांनी 'दबंग 3' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.