 
                                                                 महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची कन्या सई मांजरेकर (Sai Manjrekar) 'दबंग 3' (Dabangg 3) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये थोडक्यात रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सलमान आणि महेश मांजेरकर यांची मैत्री सर्वश्रुत आहे. म्हणूनच सईला आपल्या चित्रपटातून लाँच करण्यात सलमान खानचा मोठा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनपासूम सई खूपच चर्चेत आली आहे. किंबहुना तिच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल कुणालाही काही खबर लागू नये म्हणून शूटिंग सेटवरही सलमानने अनेक निर्बंध आणले होते. नुकतेच सलमान (Salman Khan), सई आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओमध्ये एकत्र दिसले. यावेळी या तिघांचा ग्लॅमरस अंदाज पाहून सर्वच जण थक्क झाले.
यात सलमान काळ्या रंगाच्या लेदर जॅकेटमधला हॉट लूक, सोनात्रीचा काळ्या रंगाच्या ड्रेसमधील बोल्ड लूक सोबत सईचा पांढ-या रंगाच्या शरा-यामधील ग्लॅमरस अंदाजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


हेदेखील वाचा- Saiee Manjrekar Glam Look: महेश मांजरेकर यांची मुलगी 'सई' दबंग 3 मधून बॉलीवूडमध्ये करत आहे पदार्पण; पहा तिचे ग्लॅमरस फोटो


दबंग 3 मधील सईचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर ती बरीच चर्चेत आली होती. तसेच मराठी सोबत बॉलिवूडकरांची देखील या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी उत्सुकता वाढली आहे. तसेच या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा देखील असल्यामुळे सई आणि सोनाक्षीमध्ये कोण कोणावर भारी पडेल हे येत्या 20 डिसेंबरला सर्वांना कळेलच.
दबंग 3 मध्ये सलमान खान चुलबुल पांडे या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.सोबत सोनाक्षी सिन्हा आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता किच्चा सुदीप यांची प्रमुख भूमिका असणार आहे. प्रभदेवा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या 20 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
