Saaho New Poster: 'साहो'च्या नव्या पोस्टरवर श्रद्धा कपूर-प्रभास यांचा अॅक्शन अवतार (Photo)
Saaho Film Poster (Photo Credits: Twitter)

प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) स्टारर 'साहो' (Saaho) हा बहुप्रतिक्षित सिनेमाबद्दल प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत. या सिनेमाचे नवे पोस्टर समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी साहो सिनेमाचे प्रभास-श्रद्धाचा रोमँटीक अंदाज असलेले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यानंतर आता या नव्या पोस्टरवर दोघांचाही नवा अंदाज पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर प्रभास-श्रद्धा अॅक्शन अवतारात झळकत आहे.

श्रद्धा कपूर ने हे पोस्टर आपल्या ट्विटर हँटलवरुन शेअर केले आहे. हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा असल्याचे तिने म्हटले आहे. (अखेर साहो चित्रपटाचे पहिले गाणे 'सायको सैयां' आले प्रेक्षकांच्या भेटीला, श्रद्धा कपूर आणि प्रभास ची पाहायला जबरदस्त केमिस्ट्री)

श्रद्धा कपूर ट्विट:

यापूर्वी साहो हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र याच दिवशी अक्षय कुमार (Akshay Kumar) चा 'मिशन मंगल', जॉन अब्राहम (John Abraham) चा 'बाटला हाऊस' हे दोन सिनेमे देखील प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबर साऊथचे दोन मोठे सिनेमेही याच दिवशी प्रदर्शित होत असल्याने बिग बजेट साहो सिनेमावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ही टक्कर टाळण्यासाठी सिनेमा 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदी सह हा सिनेमा तमिळ आणि तेलुगू या भाषेतही प्रदर्शित होईल. (प्रभास याच्या 'साहो' सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर; अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्या सिनेमांशी टळली टक्कर)

बाहुबली स्टार प्रभास साऊथमध्ये अत्यंत लोकप्रिय असून त्याची लोकप्रियता बॉलिवूड स्टार्सला टक्कर देण्याइतकी नक्कीच आहे. याशिवाय प्रभास-श्रद्धा ही नवीकोरी जोडी, त्यांची केमिस्ट्री, रोमान्स आणि अॅक्शन पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. 'साहो' सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या शिवाय नील नितीन मुकेश, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ आणि मंदिरा बेदी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.