Runway 34 Motion Poster: अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Runway 34 Motion Poster (Photo Credit - Insta)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांच्या आगामी चित्रपट 'रनवे 34' (Runway 34) या चित्रपटाचे मोशन पोस्टर (Motion Poster) रिलीज झाले आहे, त्यासोबतच हा चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित होईल हेही सांगण्यात आले आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये अजय देवगणपासून ते अमिताभपर्यंत सगळेच अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहेत. विमानाचा खडखडाट आणि धावपट्टीच्या मधोमध उभ्या असलेल्या अजय-अमिताभ बच्चन यांच्या अ्ॅक्शनने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. पोस्टर खूपच मनोरंजक आहे, त्यामुळे लोकांची उत्सुकताही खूप वाढत आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार असा प्रश्न कमेंट सेक्शनवर विचारला जात आहे. सध्या चाहते फक्त 'रनवे 34'च्या पोस्टर पाहुन आंनदी आहेत. हा चित्रपट 29 एप्रिल 2022ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

 

या चित्रपटात रकुल आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका

अजयने या चित्रपटात दिग्दर्शनासोबतच अभिनयाची जबाबदारीही सांभाळली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्याशिवाय बोमन इराणी, रकुल प्रीत सिंग आणि अंगिरा धर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यापूर्वी अजय देवगण आणि बोमन इराणी यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचे सांगितले होते. एका खास पद्धतीने माहिती देताना अजयने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो संपूर्ण क्रूसोबत दिसत होता. (हे ही वाचा Chakda X'press: क्रिकेटर बनण्यासाठी अनुष्का शर्माने कसली कंबर, ट्रेनिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगण या चित्रपटासाठी खुप उत्सुक

या चित्रपटाबद्दल अजय देवगण खूप उत्सुक आहे कारण अमिताभ बच्चन याना पहिल्यादांच अजय देवगण चित्रपटात दिग्दर्शित काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना अजयने पीटीआयला सांगितले की, त्याच्यांसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. अजय देवगण म्हणाला- 'मी त्याच्यापेक्षा जास्त समर्पित अभिनेता पाहिलेला नाही.