RRR Movie: 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या भव्य स्मारकावर प्रमोशन करणारा 'RRR' ठरला पहिला चित्रपट
RRR (Photo Credit - Twitter)

एसएस राजामौली (S.S Rajamouli) यांचा भव्य चित्रपट 'RRR' लवकरच प्रेक्षकांसमोर आपली भव्यता दाखवण्यासाठी सज्ज आहे ज्यात ज्युनियर एनटीआर (JN NTR), राम चरण (Ram Charan) सुपरस्टार दिसणार आहेत. राजामौली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. चित्रपट ज्या प्रकारे भव्य आहे, त्याच पद्धतीने त्याचे प्रमोशनही वेगळ्या आणि भव्य पद्धतीने व्हायला हवे. गुजरातमध्ये असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या भव्य स्मारकावर पहिल्यांदाच चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले आहे. सुपरस्टार एनटीआर ज्युनियर, राम चरण आणि एसएस राजामौली यांनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' जवळ उभे राहून फोटो काढले आहे, आणि त्यांची उपस्थिती दर्शवण्यासाठी स्वाक्षरी केली.

Tweet

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे उपस्थित राहून चित्रपटाच्या टीमने चित्रपटाबद्दलचा आदर आणखी वाढवला आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'RRR' या चित्रपटातून एसएस राजामौलीसोबत हा सुपरस्टार सर्व भाषांमधील लोकांच्या हृदयावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात एनटीआर ज्युनियर कोमाराम भीमची भूमिका साकारत आहे जो स्वातंत्र्यसैनिक आहे. 'RRR' हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.