बॉलिवूडचा धडाकेबाज दिग्दर्शक रोहित शेट्टी याने कोरोना व्हायरसच्या संकटात जीवाची बाजी लावून मुंबईमध्ये रस्त्यावर ड्युटी करणार्या पोलिसांसाठी पुढे आला आहे. मुंबई पोलिसांच्या सेवेने रोहित शेट्टीने मुंबईमधील 8 विविध हॉटेल्स खुली करून दिली आहेत. सध्या कोरोना व्हायरस विरूद्धच्या युद्धात मुंबई पोलिस अग्रस्थानी उभे राहून लढत आहेत. दरम्यान मुंबईत झपाट्याने कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने आता पोलिसांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना आराम, जेवणाची आणि इतर सोयी सुविधांसाठी ही हॉटेल्स सज्ज असतील. आज मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून याबाबत माहिती देताना रोहित शेट्टीचे आभारदेखील मानले आहेत. Coronavirus: मुंबई पोलिसांच्या भावनिक व्हिडिओ ला पाठिंबा दर्शवत अजय देवगण आणि आलिया भट यांनी आपल्या फिल्मी अंदाजात दिला जनतेला मोलाचा संदेश.
रोहित शेट्टी प्रमाणेच यापूर्वी सोनू सूद, बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान यांनी कोरोना विरूद्धच्या लढाईमध्ये त्यांची ऑफिस, हॉटेल्स दिली होती. तर वरुण धवनने कोरोनाविरूद्धच्या लढाईतील योद्धांसाठी जेवणाची सोय केली आहे. कोरोना व्हायरस बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शाहरुख खान याने दिली ऑफिसची जागा; BMC ने ट्विट करत मानले आभार.
Mumbai Police Tweet
#RohitShetty has facilitated eight hotels across the city for our on-duty #CovidWarriors to rest, shower & change with arrangements for breakfast & dinner.
We thank him for this kind gesture and for helping us in #TakingOnCorona and keeping Mumbai safe.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 21, 2020
दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबधित महाराष्ट्रात असून मुंबई शहर अग्रस्थानी आहे. धारावी, वरळी कोळीवाडा या भागामध्ये कोरोनाबाधित मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना घरातच राहण्याचं कळकळीचं आवाहन करण्यात आलं आहे.
आज (मंगळवार, 21 एप्रिल 2020) सकाळी 10 वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात नवे 472 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना व्हायरस बाधित एकूण रुग्णांची संख्या 4676 इतकी वाढली आहे. नऊ रुग्णांच्या नव्याने झालेल्या मृत्यूसह राज्यभरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची सख्या 232 इतकी झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.