भारत देशामध्ये दिवसेंदिवस वाढणारा कोरोना व्हायरसचा धोका नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतानिर्माण करणारा आहे. यामधून बॉलिवूड मधील कलाकार देखील सुटलेले नाहीत. सध्या देशात लॉकडाऊन आहे. मात्र अनेक सामाजिक संसथा गरजू, गोर गरिबांसह डॉक्टर, नर्सच्या मदतीला धावून आले आहेत. बॉलिवूडमधील तरूण कलाकारांपैकी एक वरूण धवनने देखील सामाजिक भान राखत मुंबईमध्ये हातावर पोट असणार्‍या अनेक गरीबांसह कोव्हिड 19 ला रोखून धरण्यासाठी जीवाची बाजी लावून लढणार्‍या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य यंत्रणेतील मेडिकल स्टार्फच्या जेवणाची सोय केली आहे. वरूण धवनने (Varun Dhawan) खास प्रसिद्धीपत्रक जारी करत आपल्याला कोरोनाचा लढा एकत्र येऊन लढायचा आहे. अशावेळेस निराधार, बेरोजगार लोकांसह डॉक्टर, नर्सच्या जेवणाची सोय मी 'ताज पब्लिक सर्व्हिस वेल्फेअर ट्रस्ट'च्या माध्यमातून करत असल्याचं त्याने जाहीर केलं आहे. Coronavirus विरुद्ध लढाईत अमिताभ बच्चन यांनी उचलली मोठी जबाबदारी; फिल्म असोसिएशन च्या 1 लाख मजुरांना वाटणार महिन्याचा किराणा.

कोरोना व्हायरसमुळे रोजंदारीवर असलेल्या अनेक सिनेक्षेत्रातील कामगारांची जबाबदारी अभिनेता सलमान खानने उचलली आहे. त्याने अशा लोकांच्या अकाऊंटमध्ये काही पैसे मदत म्हणून दिले आहेत. तर अभिनेता शाहरूख खान याने त्याचं मुंबईमधील ऑफिस बीएमसीला मदतकेंद्र उभारण्यासाठी खुलं करून दिलं आहे. यासोबतच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये अक्षय कुमार, शिल्पा शेट्टीचा समावेश आहे. कोरोना व्हायरस बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शाहरुख खान याने दिली ऑफिसची जागा; BMC ने ट्विट करत मानले आभार

Varun Dhawan Tweet

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 5000 च्या पार गेला आहे. तर देशातील सर्वाधिक रूग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1018 पर्यंत पोहचला आहे तर मृतांचा आकडा 60 च्या पार गेला आहे. भारतामध्ये 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. या काळात नागरिकांना संचारबंदी आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.