रितेश देशमुख (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतो. आपल्या अभिनयामुळे रितेशने आज त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र, रितेशला अद्याप सुपरस्टार हा टॅग मिळालेला नाही. आजही तो हा टॅग मिळवण्यासाठी खटाटोप करत आहे. परंतु, असं असलं तरी रितेशचे टिक टॉक व्हिडीओ (Tik Tok Video) तुफान व्हायरल होतात. मागील काही दिवसात रितेश टिक टॉकचा सुरपस्टार बनला आहे.

रितेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हिंदू-मुस्लिम (Hindu Muslim) ऐक्याचा संदेश देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक तसेच कमेंन्ट्स दिल्या आहेत. त्याने आपला चित्रपट 'बंगिस्तान'चं गाणं 'अल्लाह हू हे राम' म्हणत देशात शांती प्रस्तापित करण्याचा संदेश दिला आहे. तसेच रितेशने या व्हिडिओला 'हिंदू-मुस्लिम...भाई-भाई' (Hindu Muslim Bhai Bhai) असा टॅगही दिला आहे. हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (हेही वाटा - 'Sooryavanshi' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी उशिरा पोहोचलेल्या रणवीर सिंह ची अजय देवगण आणि अक्षय कुमारसह पत्नी दिपिका पादुकोण ने घेतली शाळा, वाचा मजेशीर कमेंट)

 

View this post on Instagram

 

हिंदू-मुस्लिम .... भाई-भाई

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

रितेश देशमुखला चित्रपटातूनही ऐवढी लोकप्रियता मिळाली नसेल जेवढी त्याला त्याच्या टिक टॉक व्हिडिओमुळे मिळते. रितेशच्या टिकटॉक व्हिडिओत त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते. सध्या रितेशचा आर्मी कट हेअरस्टाईल आणि केसांना व्हाईट रंग चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा हा नवा लूक पाहून त्याचे चाहते अवाक् झालेत. रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो लवकरच ‘बागी 3’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर व अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.