Rishi Kapoor Birth Anniversary: ऋषि कपूर यांच्या जयंती निमित्त मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिने जुने फोटो शेअर करुन लिहिली 'ही' भावूक पोस्ट
Riddhima Kapoor (Photo Credits: Instagram)

Rishi Kapoor 68th Birth Anniversary: बॉलिवूडचा एक काळ गाजवणारे आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेले दिवंगत अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांची आज 68 वी जयंती. त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आणि आठवणींनी उजाळा देण्यासाठी त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahani) हिने आज सोशल मिडियाच्या माध्यमातून काही खास फोटो शेअर करुन या फोटोखाली स्पेशल नोट लिहिली आहे. 30 एप्रिल 2020 रोजी ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीसह संपूर्ण देश हळहळला. त्यांच्या कुटूंबियालाही हे दु:ख पचवणे अवघड झाले.

ऋषि कपूर यांची कन्या रिद्धिमाने त्यांच्या आठवणींना उजाळा खास फोटो शेअर केले आहेत. याखाली तिने आपल्या वडिलांसाठी सुंदर असा संदेश लिहिला आहे. ऋषि कपूर यांच्या निधनानंतर कोलमडून गेलीय पत्नी नीतू सिंह, फोटो शेअर करुन म्हणाली 'आमच्या गोष्टीचा झाला शेवट'

'बाबा, लोक म्हणतात जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला गमावता ज्यांच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तेव्हा तुमचे हृदय पूर्णपणे तुटून जाते. लेकिन मला माहिती आहे या तुटलेल्या हृदयामध्ये तुम्ही अजूनही जिवंत आहात आणि कायम राहणार. मला माहित आहे तुम्ही आम्हा सर्वांना पाहात आहात. तसेच याचीही काळजी घेत आहात की आम्ही तुम्ही शिकवलेल्या मूल्यांचे नीट पालन करत आहोत की नाही. मला तुम्ही नात्यांचे महत्व शिकवलेत आणि मला एक चांगली व्यक्ती बनवलात जी मी आज आहे. मला तुमची रोज आठवण येते आणि नेहमीच येत राहील. आज आणि कायम तुमचा वाढदिवस साजरा करेन. हॅप्पी बर्थडे' असे रिद्धिमाने या पोस्टखाली लिहिले आहे.

रिद्धिमाने आपल्या आई-वडिलांसोबतचे खूप जुने आणि सुंदर असे अविस्मरणीय फोटोज शेअर केले आहेत. रिद्धिमासह ऋतिक रोशन याची आई पिंकी रोशन यानीही ऋषि कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.