ऋषि कपूर यांच्या निधनानंतर कोलमडून गेलीय पत्नी नीतू सिंह, फोटो शेअर करुन म्हणाली 'आमच्या गोष्टीचा झाला शेवट'
ऋषि कपूर यांच्या या फोटोखाली 'आमच्या गोष्टीचा शेवट झाला' असे नीती सिंह यांनी लिहिले आहे. त्यांच्या या वाक्यातूनच त्यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर स्पष्ट दिसत आहे
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि हरहुन्नरी अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह असंख्य चाहते हळहळले. त्यांच्या जाण्याने सर्वात जास्त कोण कोलमडून गेले असेल तर त्यांची पत्नी नीतू सिंह (Neetu Singh). कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी परदेशात गेल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती त्यांच्या सोबत होती. त्यामुळे आपल्या पतीचे जाण्याचे दु:ख त्या पचवू शकत नाहीय. त्यांच्या सुखा-दु:खात नेहमी त्यांच्या सोबत असलेली त्यांची पत्नी मनातून पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आपले हे दु:ख त्यांनी इन्स्टावर ऋषि कपूर यांचा एक फोटो शेअर करुन व्यक्त केले आहे.
ऋषि कपूर यांच्या या फोटोखाली 'आमच्या गोष्टीचा शेवट झाला' असे नीतू सिंह यांनी लिहिले आहे. त्यांच्या या वाक्यातूनच त्यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर स्पष्ट दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासोबतचे फोटो शेअर करत ट्विटर वर दिले 'या' प्रश्नाचे उत्तर (See Photo)
त्यांच्या या कॅप्शनवर अनेक अनुपम खेर, सोनू सूद, रविना टंडन यांसारख्या अनेक कलाकारांना कमेंट करत त्यांना धीर दिला आहे. काही गोष्टींचा कधीच शेवट होत नाही आणि तुम्हा दोघांची गोष्टी ही सदाबहार आहे असे बॉलिवूडकरांनी म्हटले आहे.
ऋषि कपूर यांना श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने त्यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आली. मात्र गुरुवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाल्याची बातमी मिळाली आणि सर्वांना धक्काच बसला.
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2020 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

