Rhea Chakroborty Bail Plea: रिया व शोविक चक्रवर्ती च्या जामीन अर्जावरची आजची सुनावणी पावसामुळे टळली, निकालासाठी उद्यापर्यंत प्रतिक्षा
Showik, Rhea Chakraborty (Photo Credits: File Image)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यू प्रकरणी ड्रग्सच्या अनुषंगाने तपासात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) दोषी आढळले होते. हे दोघेही सध्या NCB च्या कोठडीत आहेत. रिया आणि शोविक यांनी बॉम्बे हायकोर्टात (Bombay High Court) जामीन अर्ज दाखल केला होता ज्यावर आज सुनावणी होणार होती मात्र काल मध्य रात्री पासुन मुंंबईत सुरु असणार्‍या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rains) आज उच्च न्यायालयाचे काम बंंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिणामी रियाच्या जामीन अर्जावरची सुनावणी सुद्धा आज ऐवजी उद्यावर ढकलण्यात आली आहे.यासंदर्भात रियाचे वकील सतीश मानशिंंदे यांंनी माहिती दिली आहे.

रिया चक्रवर्ती हिला NCB कडून 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबईच्या विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया-शोविकच्या अटकेनंतर त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी बॉम्बे हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. रिया आणि तिचा भाऊ शोविक यांंच्यावर ड्रग्ज खरेदीचा आरोप होता ज्यावर दोघांंनीही कबुली दिली आहे.

ANI ट्विट

दरम्यान या ड्रग्जप्रकरणात आतापर्यंत 18 जणांंना अटक करण्यात आली आहे, बॉलिवूड च्या अनेक कलाकारांंची नावे सुद्धा यामध्ये समोर आली आहेत ज्यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत, नम्रता शिरोडकर यांंचा सुद्धा समावेश आहे. दुसरीकडे रियाला मात्र आजची रात्र पुन्हा तुरुंंगातच काढावी लागणार आहे.