Rhea Chakraborty New Boyfriend: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात आला नवा जोडीदार; Bunty Sajdeh ला डेट करत असल्याची चर्चा
रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) नाव चर्चेत आले होते. रिया कथितरीत्या सुशांतची गर्लफ्रेंड होती. रियावर सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आणि त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता. यानंतर रिया आणि तिच्या भावालाही तुरुंगात जावे लागले होते. जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला अनेक यूजर्सनी ट्रोल केले होते. आता बातम्या येत आहेत की, अभिनेत्री रिया ही सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेहला डेट (Bunty Sajdeh) करत आहे. बंटी हा क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील एका मोठ्या व्यवस्थापन फर्मचा मालक आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया त्याला डेट करत होती. तिने सोशल मीडियावर सुशांतसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांतच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी रिया पुन्हा प्रेमात पडली आहे. ही व्यक्ती बंटी सजदेह असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, गेल्या काही वर्षांत रियाला ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागला आहे, त्यात बंटी हा तिचा सपोर्ट सिस्टम होता. गेल्या दोन वर्षांमध्ये बंटीनेच रियाला मानसिक आधार दिला आहे. परंतु या दोघांच्या नात्याबद्दल अजूनतरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bunty Sajdeh (@buntysajdeh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bunty Sajdeh (@buntysajdeh)

रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, रिया पूर्वी बंटीच्या क्लायंटपैकी एक होती आणि जेव्हा सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात रियाची चौकशी करण्यात आली तेव्हा बंटीला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रिया चक्रवर्तीपूर्वी बंटी सजदेहचे नाव सोनाक्षी सिन्हासोबतही जोडले गेले आहे. याशिवाय तो सुष्मिता सेनसोबतही रिलेशनशिपमध्ये होता. बंटी सजदेह हा अभिनेता सोहेल खानची माजी पत्नी आणि अभिनेत्री सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' या मालिकेत दिसली होती. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात आला नवा जोडीदार; Bunty Sajdeh ला डेट करत असल्याची चर्चा)

दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी रियावर त्याचा मानसिक छळ केल्याचा, पैशासाठी त्याचे शोषण केल्याचा आणि त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रियाची अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात आली. याशिवाय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही तिची चौकशी केली. रिया 2020 मध्ये एक महिन्यासाठी तुरुंगातही गेली आहे.