Kantara: 'कांतारा' (Kantara Film) चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, चित्रपटाच्या 'वराह रूपम' गाण्याबाबत निर्मात्यांवर साहित्यिक चोरीचा आरोप आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल देताना विजय किरगंडूर आणि 'कंतारा'चे निर्माते-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांना दिलासा दिला आहे. चित्रपटात 'वराह रूपम' हे गाणे दाखवले जाणार नाही, असा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
'कांतारा' चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. यासोबतच चित्रपटातून गाणे हटवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, 'चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक विजय किरगंडूर आणि ऋषभ शेट्टी यांना गाण्याच्या कॉपीराइट उल्लंघनाच्या तपासासंदर्भात 12 आणि 13 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहिल्यावर त्यांना अटक केली जाणार नाही.' (हेही वाचा -Nawazuddin Siddiqui च्या पत्नीच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने आलियाला पाठवले समन्स)
ऋषभ शेट्टीचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील 'वरह रूपम' या गाण्यावर केरळ बँड तैकुदम ब्रिजने चोरीचा आरोप लावला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या 'नवरसम' गाण्याची कॉपी केली आहे. यानंतर कायदेशीर कारवाई करत 'वराह रूपम'चा व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट करण्यात आला. मात्र, चित्रपटातून हे गाणे हटवण्यात आले नाही. उच्च न्यायालयाने हे गाणेही चित्रपटातून काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
Plagiarism row | Supreme Court relaxes the condition imposed by Kerala High Court that Kannada movie 'Kantara' should not exhibit 'Varaharoopam' song. pic.twitter.com/G738DtTSWQ
— ANI (@ANI) February 10, 2023
'कांतारा'मधील 'वराह रूपम' हे गाणे काढून टाकण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तर चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकालाही अटकपूर्व जामीन मिळाला आहे. 'कांतारा' 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज झाला होता. या कमी बजेटच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.