Real Name of Bollywood Stars: बॉलिवूड मधील 'या' दिग्गज कलाकारांची खरी नावे तुम्हाला माहिती आहेत का?
Real Name of Bollywood Stars: बॉलिवूड मधील 'या' दिग्गज कलाकारांची खरी नावे तुम्हाला माहिती आहेत का? (Photo Credits-Facebook/Edited)

Real Name of Bollywood Stars: बॉलिवूड बद्दल बोलायचे झाले तर सर्वांसमोर प्रथम महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांच्यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा यांचा चेहरा समोर येतो. अभिताभ बच्चन यांना ह्याच नावाने सर्वत्र ओळखले जाते. मात्र या व्यतिरिक्त फक्त बिग बी (Big B) या नावाने त्यांना ओखळले जाते.

मात्र तुम्हाला खरे सत्य वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की, कलाकारांची खरी नावे आणि बॉलिवूडमधील नावे प्रत्यक्षात वेगळी आहेत. कॉमेडी क्षेत्रातील प्रसिद्ध जॉनी लिवर (Johnny Lever), एक्शन स्टार जॉन अब्राहम (John Abraham) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सह अन्य कलाकारांनी बॉलिवूड जगतात यश मिळवण्यासाठी आपली नावे बदलली आहेत.

काही जणांनी ग्रह नक्षात्रांचा हवाला देऊन नाव बदलले तर काहींनी कोणच्यातरी सांगण्यावरुन आपले खरे नाव बदलले आहे. नाव बदलण्याची परंपरा ही जुनीच आहे. बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचे खरे नाव 'इनकलाब श्रीवास्तव' आहे. मात्र बच्चन यांचे हे नाव फक्त मोजक्याच जणांचा माहिती आहे. तसेच बाहुबली म्हणून ओखळ असलेला कलाकार प्रभास याचे खरे नाव 'वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उपालपति' असे आहे.

त्याचसोबत दिग्गज कलाकार मिथुन चक्रवर्ती यांचे मूळ नाव 'गौरांग चक्रवर्ती' असे असून त्याचे हे नाव फक्त जवळच्या नात्यामधील लोकांनाच माहिती आहे. तर एक्शन स्टार टायगर श्रॉफ याचे खरे नाव 'जय हेमंत श्रॉफ' असे आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांनी या क्षेत्रात आपली प्रगती होण्यासाठी नावे बदलली असल्याचे म्हणण्यास हरकत नाही.