अबब! बॉलीवूडची 'ड्रीम गर्ल' Hema Malini हिच्या संपत्तीत, गेल्या पाच वर्षांत झाली तब्बल ३४.४६ कोटींची वाढ; जाणून घ्या तिची एकूण संपत्ती
Hema Malini (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री हेमा मालिनी यांना 'ड्रीम गर्ल' ही उपाधी पुरेपूर शोभून दिसते. त्यांनी आजवर त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे बॉलीवूडला दिले. एक उत्तम अभिनेत्री आणि एक उत्तम डान्सर अशी त्यांची ओळख असली तरी राजकारणात देखील त्यांनी त्यांचे स्थान बनवले होते.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हेमाजींविषयी एक अशी गोष्ट जी वाचून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. हेमा मालिनी या कोट्याधीश संपत्तीच्या मालकीण आहेत. आणि आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ.

2014 साली लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी यांची संपत्ती 66 कोटी इतकी होती. परंतु गेल्या 5 वर्षात, त्यांच्या संपत्तीमध्ये तब्बल ३४.४६ कोटींची वाढ झाली आहे. आता हेमा यांची एकूण संपत्ती 101 कोटींपर्यंत पोहोचली आहे.

Rajkumar Rao च्या बाईकची किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का; पहा फोटो

प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार हेमा यांच्याकडे दोन कार आहेत. त्यातील एक गाडी ही 33.62 लाखांची मर्सिडीज आहे.