Rajkumar Rao च्या बाईकची किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का; पहा फोटो
Rajkumar Rao (Photo Credits: Instagram)

आपण राजकुमार राव याला एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखतो. बॉलीवूडमध्ये त्याचे अनेक हिंदी चित्रपट आहेत. या अभिनेत्याला अभिनयासोबतच बाईक राईडची पण भयंकर क्रेझ आहे. त्याने अनेक चित्रपटात बाईक राईडचे सीन केलेत पण आता रिअल लाईफ मध्येही तो बाईकचे स्टंट्स करताना दिसू शकतो. कारण नुकतीच राजकुमारने हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब (Harley Davidson Fat Bob) ही बाईक खरेदी केली आहे. आणि या बाईकची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

या बाईकची एक्स-शोरूम किंमत 14.69 लाख रुपये आहे व हे मॉडेल 2017 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.

Benelli कंपनीची 'ही' आहे भारतातील सर्वात स्वस्त बाइक; फक्त 6000 रुपयांत करू शकता बुकिंग

Harley Davidson कंपनीने स्वतः ट्विट करून राजकुमार राव यांचे स्वागत केले आणि लिहिले की त्यांनी या बाईक राइडचा आनंद घ्यावा अशी अपेक्षा आहे.

पहा ट्विट

जाणून घ्या या बाईकचे फीचर्स

जुन्या Harley Davidson बाईक्सच्या तुलनेत या बाईकमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. ही बाईक खूपच अग्रेसिव्ह आहे. बाईकच्या इंजिनमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. यात 34 स्टीफर 1745 सीसी इंजिन आहे जे 18050 किमी प्रतितास वेगाने 3250 आरपीएम वर 145Nm टॉर्क जनरेट करू शकते.